बार्शी येथे पुणे विभाग शिक्षक मतदारसंघ प्रचार सभा उत्साहात;

रोहित पवार यांनी मांडली शिक्षक प्रश्नांवर भूमिका
बार्शी प्रतिनिधी - पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बार्शी येथे राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांची प्रचार सभा पार पडली. या सभेत शिक्षक मतदारांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. यावेळी बोलताना रोहित पवार म्हणाले, राज्यातील शिक्षकांवर अशैक्षणिक कामांचा बोजा वाढला आहे. जुनी पेन्शन योजना, टप्पा अनुदान, शिक्षक भरती, अनुदानित शाळांचा प्रश्न, संच मान्यता यासारखे प्रश्न सरकारने प्राधान्याने सोडवणे गरजेचे आहे. शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी सभागृहात प्रभावीपणे आवाज उठवणारा प्रतिनिधी निवडणे काळाची गरज आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, शिक्षक मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार प्रा. जयंत दिनकर आसगावकर आणि पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार सौ. हर्षदा देशमुख-जाधव यांच्या प्रचारार्थ आमदार रोहित पवार यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या सभेस पंचायत समितीचे पदाधिकारी, मुख्याध्यापक महामंडळाचे सदस्य, शिक्षक संघटनांचे प्रतिनिधी, पदवीधर मतदार व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form