**शिक्षकांच्या हक्कांसाठी, सन्मानासाठी आणि न्यायासाठी शिक्षकांचा आमदार हवा!**

🌹 **मा. दत्तात्रय अच्युतराव सावंत सर यांच्याविषयी विचार का करावा?** शिक्षक मतदारसंघ हा केवळ निवडणुकीचा विषय नाही, तर शिक्षकांच्या हक्कांचा, सन्मानाचा आणि भविष्यातील सुरक्षिततेचा आवाज आहे. या मतदारसंघातून निवडून जाणारा प्रतिनिधी हा शिक्षकांच्या अडचणींची जाणीव असणारा, त्यांच्या संघर्षाशी जोडलेला आणि प्रश्न सुटेपर्यंत सातत्याने पाठपुरावा करणारा असणे गरजेचे आहे. ✊ **शिक्षकांच्या जिव्हाळ्याचे काही महत्त्वाचे प्रश्न—** 🔹 **जुनी पेन्शन योजना:** १ नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्त होऊन नंतर अनुदानावर आलेल्या कर्मचाऱ्यांसह सर्वानाच पेन्शनच्या प्रश्नावर न्याय मिळवून देण्यासाठी 🔹 **अशैक्षणिक कामांचा वाढता भार:** शिक्षकांना BLO, SIR विविध सर्वेक्षणे आणि इतर अशैक्षणिक कामांमध्ये गुंतवून ठेवण्याऐवजी अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळाला पाहिजे. विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणाऱ्या शिक्षकांना वर्गाबाहेरील कामांच्या ओझ्यातून मुक्त करणे ही काळाची गरज आहे. 🔹 **पवित्र पोर्टल नियमित सुरू राहावे:** शिक्षक भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गतिमान असावी. पवित्र पोर्टल दर सहा महिन्यांनी सुरू राहिल्यास शिक्षकांची रिक्त पदे भरण्यास मदत होईल आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान कमी करता येईल. 🔹 **TET परीक्षेचा प्रश्न:** शिक्षकांच्या सेवाशर्ती, नियुक्तीची तारीख आणि लागू असलेल्या नियमांचा विचार करून TET संदर्भातील प्रश्नांवर न्याय्य भूमिका मांडणे आणि शिक्षकांना योग्य दिलासा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. 🔹 **शिक्षकांचा सन्मान आणि स्वाभिमान:** शिक्षकांच्या विरोधात खालच्या पातळीवर बोलणाऱ्या प्रवृत्तीला ठाम उत्तर देणारा, शिक्षकांचा सन्मान राखणारा आणि त्यांच्या प्रश्नांची प्रतिष्ठेने मांडणी करणारा प्रतिनिधी हवा. शिक्षक आमदार प्रशांत बंब यांच्या शिक्षकांविषयीच्या वक्तव्यांमुळे निर्माण झालेल्या नाराजीच्या पार्श्वभूमीवर शिक्षकांचा स्वाभिमान जपणे अधिक महत्त्वाचे आहे. 🔹 **अनुदानित शाळा आणि शिक्षणाचे प्रश्न:** अनुदानित शाळांचे अस्तित्व टिकवणे, रिक्त पदे भरणे, पदमान्यता, संचमान्यता, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन आणि वेतनविषयक प्रश्नांवर ठोस पाठपुरावा झाला पाहिजे. 🌟 **दत्तात्रय सावंत सर यांच्याकडून अपेक्षा ही केवळ आश्वासनांची नाही, तर शिक्षकांच्या प्रश्नांवर सातत्याने काम करणाऱ्या नेतृत्वाची आहे.** शिक्षकांच्या चळवळीशी नाते असलेला, संघटनांशी संवाद ठेवणारा आणि शिक्षकांचे प्रश्न शासनदरबारी व विधिमंडळात प्रभावीपणे मांडणारा प्रतिनिधी शिक्षकांना हवा. 📌 **आपण मतदान करताना उमेदवाराचा अनुभव, शिक्षकांच्या प्रश्नांवरील भूमिका, प्रत्यक्ष कामाचा लेखाजोखा आणि भविष्यातील कृती आराखडा यांचा विचार करूया.** 🙏 शिक्षकांचा सन्मान, शिक्षकांचे हक्क आणि शिक्षण क्षेत्राचे हित जपण्यासाठी जागरूकपणे मतदानाचा निर्णय घेऊया. **शिक्षकांचा आवाज बुलंद असावा! शिक्षकांचा आमदार शिक्षकच हवा!** *प्रसाद गायकवाड, पुणे*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form