सोलापूर प्रतिनिधी -
सालाबाद प्रमाणे श्री कालिका मंदिर शुक्रवार पेठ सोलापूर येथे विश्व ब्राह्मण समाज कालिका सेवा मंडळ ट्रस्टच्या वतीने नवरात्र महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी शके १९४८ रविवार दिनांक ११ ऑक्टोबर ते मंगळवार दिनांक २० ऑक्टोबर या कालावधीत विविध धार्मिक कार्यक्रमांचे नियोजन केले आहे सदर नवरात्र महोत्सव काळात खालील दिलेल्या कार्यक्रम प्रत्रिकाप्रमाणे दररोज देवेची पुजा अभिषेक,दुर्गा सप्तशती पाठ तसेच कुमारी पुजन, रुद्राभिषेक, नवचंडी यज्ञ, कुंकुमार्चन आदी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
दुर्गा सप्तशती पठण शुभारंभ व प्राणप्रतिष्ठा सौ.व श्री. रमाकांत चंद्रकांत मैंदर्गीकर यांच्या शुभहस्ते करण्याचे आयोजिले आहे
*दररोज सकाळी ०९:०० ते १२:३० दुर्गा सप्तशती पठण*
पठण प्रमुख
सौ.प्रतिभाताई महामुनी ,सौ. शैलजाताई नागेश कुरुलकर , कु.रेखाताई जोशी
*कालिकामातेस अभिषेक*
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी पर्यंत दररोज सकाळी ०९:०० वाजेपर्यंत करण्यात येतील
*कुमारिका पूजन*
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी दररोज सकाळी १०:०० वाजता करण्यात येईल
*रविवार दिनांक ११.१०.२०२६ घटस्थापना व पारायण सकाळी १०:०० वाजता सुरू होईल*
*दुग्ध सेवा*
रविवार ११.१०.२०२६ ते १९.१०.२०२६ या कालावधीमध्ये दररोज सकाळी १०:०० वाजता दुग्ध सेवा आपल्या समाजबांधवाकडून देण्याची व्यवस्था केली आहे
*उत्सव मूर्ती पूजा व ग्रंथ पूजा*
अश्विन शुद्ध प्रतिपदा ते अश्विन शुद्ध दशमी नित्य पूजा दररोज सकाळी ०८:०० वाजता
श्री.नागेश कुरुलकर ह्यांच्या हस्ते करण्यात येईल
*रुद्राभिषेक*
अश्विन शुद्ध दशमी सोमवार दिनांक १२.१०.२०२६ रोजी सकाळी ०८:०० वाजता होईल
*कुंकुमार्चन ललित पंचमी*
अश्विन शुद्ध पंचमी ललितपंचमी गुरुवार दिनांक १५.१०.२०२६ रोजी सायंकाळी ०५:०० वाजता सहस्त्रनाम पठण करण्यात येईल त्या दिवशी अल्पोपहारची सोय करण्यात आली आहे
*नवचंडी यज्ञ*
अश्विन शुद्ध अष्टमी सोमवार दिनांक १९:१०:२०२६ दुपारी ०५:०० वाजता सुरू करण्यात येईल
यजमान
श्री व सौ रमाकांत चंद्रकांत महिंद्रकर
तरी तरी या मंगलप्रसंगी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष
श्री.चंद्रशेखर बाबुराव कव्हेकर ,उत्सव समिती अध्यक्ष
श्री.प्रसाद नानासाहेब चोळचगुड्ड यांनी केले आहे
