*वाढदिवस विशेष*
सोलापूरच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रात आपल्या मनमिळाऊ स्वभावाने आणि निरपेक्ष कार्याने आपली वेगळी ओळख निर्माण करणारे व्यक्तिमत्व म्हणजे *श्री. महेशभैय्या धाराशिवकर होय.!*
महेशभैय्या यांचा स्वभाव म्हणजे अजातशत्रू. लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांशी हसतमुखाने बोलणे, प्रत्येकाच्या सुख-दुःखात धावून जाणे, हाच त्यांच्या जीवनाचा स्थायीभाव आहे. कोणतेही काम असो, ते मनापासून आणि पूर्ण जबाबदारीने करण्याची त्यांची पद्धत सर्वांना भावते. म्हणूनच आज सोलापूर आणि जिल्ह्यात दोन्हीकडे त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे.
ते केवळ स्वतःपुरता विचार न करता समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो, या भावनेने नेहमी कार्यरत असतात. कोणताही सामाजिक उपक्रम असो, धार्मिक कार्यक्रम असो वा एखाद्याच्या अडीअडचणीचा प्रश्न असो, महेशभैय्या तिथे हजर असतातच. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणे ही त्यांची खासियत आहे. त्यांच्या या निस्वार्थी कार्यामुळेच ते आज सर्वांचे लाडके झाले आहेत.
कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळून सामाजिक कार्यात सक्रिय राहणे सोपे नाही, पण त्यांनी या दोन्ही गोष्टींचा उत्तम समतोल साधला आहे. घरातील सर्वांना सोबत घेऊन, सर्वांच्या प्रगतीचा विचार करणारे त्यांचे व्यक्तिमत्व खरोखरच प्रेरणादायी आहे.
अशा या मनमिळाऊ, कर्तृत्ववान आणि सर्वांना हवेसे वाटणारे *श्री. महेशभैय्या धाराशिवकर यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा. त्यांना उदंड आयुष्य, उत्तम आरोग्य, सुख-समृद्धी लाभो आणि त्यांच्या हातून अशीच समाजसेवा घडत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.*
*शुभेच्छुक : वसंत पोतदार, सोलापूर*
*मो. ९४२३०६५९१५*
