अहमदपूर प्रतिनिधी (राम रत्नपारखी)
मैत्रे हिप्परगा कोपदेवे येथे दुष्काळ भागाची पाहाणी करुन वाढलेल्या सोयाबीन, कापूस , तुर या खरीपातील सर्व पिकांचा पंचनामा ग्रामसरीय समितीकडून प्रत्यक्ष भेट देऊन पाहाणी करुन पंचनामा करण्यात आला.
सलग दोन महिने पैक्षा जास्त काळ पावसाचा खंड पडल्यामुळे शेतक-यांनी घाबरुन न जाता अस्मानी संकटावर मात देण्यासाठी महाराष्ट्र शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. ज्या ज्या उपाय योजना शासनाने सुचवल्या आहेत ते प्रत्यक्ष राबवण्यात येतील असा ग्रामस्तरीय समिती ने गावक-यांना विश्वास दिला.
यासाठी ग्राम महसूल अधिकारी अक्षय खानापूरकर, मंडळ अधिकारी श्रीमती सूर्यवंशी मॅडम, ग्रामपंचायत अधिकारी एलगट्टे व्ही. एस., सहाय्यक कृषी अधिकारी प्रशांत पाटील, सरपंच प्रति निळकंठ गोरटे, चेअरमन नारायण आगलावे, माजी सरपंच प्रकाश गोरटे, श्रीराम महाराज गोरटे, शेतकरी मारुती चोपडे, नवनाथ अप्पा आंगुलगे, सिताराम गोरटे, रामचंद्र कदम, अनंत गोरटे, अकबर शेख, व्यंकट आगलावे, नागू पाटील, सुनील गोरटे, गोविंद दादा हंगरगे, विजय गोरटे, विठ्ठल आगलावे.. आधी शेतकरी उपस्थित होते
