पंढरपूर प्रतिनिधी
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील विद्युत अभियांत्रिकी विभागातर्फे, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग स्टुडंट असोसिएशन (EESA) व आयईईई विद्यार्थी शाखा, एस.के.एन.एस.सी.ओ.ई. कोर्टी, पंढरपूर (IEEE Student Branch, SKNSCOE Korti, Pandharpur) यांच्या सहकार्याने २९ सप्टेंबर २०२६ रोजी ELECTRA 2K26 या तांत्रिक व मनोरंजनात्मक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक ज्ञान, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता, संघभावना व स्पर्धात्मक वृत्ती विकसित करण्याच्या उद्देशाने विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.
या उपक्रमांत Quiz Competition, Tech Fix, Ludo, BGMI/Free Fire आणि Mission Melody यांसारख्या विविध स्पर्धांचा समावेश होता. विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत तांत्रिक कौशल्य, समस्या सोडविण्याची क्षमता, सर्जनशीलता, रणनीती व संघभावनेचे प्रदर्शन केले.
या कार्यक्रमास श्री. श्रीपाद यादव, श्री. आनंद भोई व श्री. श्रीकांत गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती लाभली. श्री. आनंद भोई यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर व प्रेरणादायी भाषण केले. तसेच प्राचार्य डॉ. कैलाश करांडे व डॉ. के. शिवशंकर, विभागप्रमुख व आयईईई विद्यार्थी शाखा समुपदेशक (HOD & IEEE Student Branch Counselor) यांनी विद्यार्थ्यांना तांत्रिक, स्पर्धात्मक व सहशैक्षणिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी प्रेरित केले.
यावेळी प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी विद्यार्थ्यांच्या स्पर्धात्मक परीक्षांच्या तयारीसाठी IES (Indian Engineering Services) Chapter सुरू करण्याबाबत सूचना केली. या माध्यमातून UPSC Engineering Services Examination (ESE/IES) ची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, परीक्षेविषयी जागरूकता व नियोजनबद्ध तयारीसाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा उद्देश व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. प्रदीप व्यवहारे यांनी कार्य केले. तसेच विविध स्पर्धांच्या यशस्वी आयोजनासाठी संबंधित प्राध्यापक व विद्यार्थी समन्वयकांनी सहकार्य केले. ELECTRA 2K26 या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना तांत्रिक ज्ञानासोबतच सर्जनशीलता, संघभावना, स्पर्धात्मक वृत्ती व व्यक्तिमत्त्व विकासासाठी प्रभावी व्यासपीठ उपलब्ध झाले.
