*पंढरपूरात 'नो डीजे, नो डॉल्बी' गणेशोत्सवासाठी पोलिसांचा पुढाकार; सर्व मंडळांनी घेतली शपथ*

पंढरपूर : सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मा. अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढगळे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात शांतता कमिटीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला पंढरपूर शहरातील सर्व सार्वजनिक गणपती मंडळांचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पंढरपूर शहर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री. महेश ढवाण साहेब हे देखील उपस्थित होते. बैठकीत उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत ढगळे साहेब यांनी सर्व मंडळांना यंदाचा गणेश उत्सव डॉल्बी मुक्त आणि पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन केले. 'नो डॉल्बी, नो डीजे' ही संकल्पना प्रत्येक मंडळाने राबवावी, जेणेकरून नागरिकांना ध्वनी प्रदूषणाचा त्रास होणार नाही आणि उत्सव शांततेत पार पडेल, असे आवाहन त्यांनी केले. या आवाहनाला सर्व गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी उपस्थित सर्व पोलीस अधिकारी आणि मंडळांच्या कार्यकर्त्यांनी 'नो डीजे, नो डॉल्बी' गणेश उत्सव साजरा करण्याची सामूहिक शपथ घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form