पंढरपूर प्रतिनिधी-
माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त लाडक्या बहिणींना साडी वाटप उपक्रम श्रीराम मंगल कार्यालय,इसबावी येथे ३५६१ हजार महिला भगिनींना साडी वाटप सौ.सिमाताई परिचारक,सौ.आधटराव तसेच उपस्थित महिला नगरसेविका यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी स्वर्गीय सुधाकरपंत परिचारक यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
याप्रसंगी पंढरपूर अर्बन बँकेचे चेअरमन सतिश मुळे, उपनगराध्यक्ष महादेव धोत्रे, बालाजी मलपे,विशाल मलपे तसेच आजी माजी नगरसेवक, नगरसेविका, प्रतिष्ठित नागरिक, महिला व पुरुष युवा युवती मोठ्या उपस्थित होते.
नवशक्ती तरुण मंडळ, गणेश आधटराव मित्र मंडळ यांच्या वतीने सदर उपक्रम घेण्यात आले याप्रसंगी जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या भाषणात म्हणाले की, समाजकारण व राजकारण हे आपण स्वीकारलेले कर्म असून नागरिकांच्या विविध समस्या समस्या सोडवण्याची काम आपण करत असतो हे खरच असताना स्वतःला काय मिळाले यापेक्षा आपण इतरांना काय देतो यासाठी प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे कार्यकर्ता कसा असावा याचे ज्वलंत व उत्तम उदाहरण म्हणजे गणेश अधटराव गेल्या २५ वर्षाच्या राजकारणामध्ये त्यांनी निरपेक्ष भावनेने आपले समाजकार्य केले हे करत असताना इसबावी सारख्या भागात विविध उपक्रमाद्वारे जनतेशी सुसंवाद साधून त्यांनी या भागाचा कायापालट केला असून माझ्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्ते यांनी पंढरपूर शहर व तालुक्यात अंथ अपंग निराधार यासाठी उपक्रम राबवली तसेच महिला, ज्येष्ठ नागरिक, क्रीडा स्पर्धा आदी विविध उपक्रम साजरी केले तर महिला व पुरुषांच्या आरोग्यासाठीही आरोग्य शिबिराची नियोजन केले अशा विविध उपक्रमातून सर्वस्तरतील लोकांना एकत्र आणून जे कार्य केले ते खूप मोलाचे आहे.
चौकट-
*कार्यकर्त्यांचे ऋण परिचारक परिवार कधीच विसरणार नाही*
--------------------------------------
आमच्या कातडंयाचे जोडे करुन आमच्यासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांना दिले तरी ते ऋण फिटणार नाही.कार्यकर्त्याचे ऋण व्यक्त व्हायचे नसते तर कार्यकर्त्यांच्या ऋणात राहायचे असते असा मोलाचा भावनिक संदेश प्रशांत परिचारक यांनी सदर कार्यक्रमाप्रसंगी केला कार्यकर्ता कसा असावा तर गणेश भाऊ आधटराव यांचा सारखा निरपेक्ष असावा, कार्यकर्त्यांचे ऋण परिचारक परिवार कधीच विसरणार नाही असे ते म्हणाले.


