गणेश विसर्जन मिरवणुकीत स्वराज्य पोलीस मित्र संघटनेचे पोलिस प्रशासनाला सहकार्य

वाहतूक नियंत्रणासह मिरवणुकीतील अडथळे दूर करण्यासाठी २५ सदस्यांचा सहभाग
पंढरपूर प्रतिनिधी : गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान पंढरपूर शहरात निर्माण होणारी गर्दी, वाहतूक कोंडी आणि विविध समस्या लक्षात घेऊन स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण व माहिती अधिकार संघटना, पंढरपूर शहर व तालुका यांच्या वतीने २५ सदस्यांनी कोणताही मोबदला न घेता पोलिस प्रशासनाला सहकार्य केले.
पंढरपूर शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने गणेशभक्त तसेच विविध भागांतील गणेश मंडळे सहभागी झाली होती. या पार्श्वभूमीवर वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तसेच मिरवणुकीच्या मार्गातील अडथळे दूर करण्यासाठी संघटनेच्या सदस्यांनी पोलिस प्रशासनासोबत समन्वय साधत काम केले. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे, महासंघटक कमलेश शेवाळे आणि महाराष्ट्र अध्यक्ष सौ. धनश्री उत्पात यांच्या मार्गदर्शनाखाली, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष कैलास कारंडे यांच्या प्रेरणेतून हा उपक्रम राबविण्यात आला.
यावेळी संघटनेच्या सदस्यांनी वाहतूक नियंत्रण, गणेश मिरवणुकीदरम्यान निर्माण होणारे अडथळे दूर करणे तसेच भाविकांना आवश्यक ते सहकार्य करण्याचे काम केले. या बंदोबस्तासाठी पोलिस स्टेशनचे घोडके साहेब तसेच वाहतूक नियंत्रण शाखेचे गायकवाड साहेब यांचे सहकार्य लाभले. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्रीराम बडवे, उपाध्यक्ष कैलास कारंडे, पंढरपूर तालुका अध्यक्ष प्रवीण सुरवसे, पश्चिम महाराष्ट्र संघटक विजय वाघमारे, तालुका उपाध्यक्ष नागेश राहीरकर, तालुका प्रवक्ता संतोष चव्हाण, सहसचिव लक्ष्मण अभंगराव, सरचिटणीस संजय चौगुले, तालुका सहसंघटक रविकांत वाळके, पंढरपूर शहर प्रसिद्धीप्रमुख पत्रकार विनोदी पोतदार, शहर संपर्कप्रमुख दत्तात्रय कमले, तालुका प्रभारी गंगाधर स्वामी यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. महिला सदस्यांनीही या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. यामध्ये तालुका उपाध्यक्ष सौ. सुवर्णा कुरणावळ, तालुका उपाध्यक्ष सौ. मेघा मोळक आणि पंढरपूर शहर अध्यक्ष सौ. म्हमाणे मॅडम यांचा सहभाग होता. पोलिस प्रशासनाला सहकार्य करत गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी संघटनेने दिलेल्या योगदानाचे उपस्थितांकडून कौतुक करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form