कोर्टी, पंढरपूर | ५ सप्टेंबर २०२६ :
एस.के.एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथे संस्थास्तरीय दीक्षांत समारंभ २०२६ व शिक्षक दिन २०२६ उत्सव दिनांक ५ सप्टेंबर २०२६ रोजी मोठ्या उत्साहात व दिमाखात संपन्न झाला.
या कार्यक्रमास पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर येथील इनोव्हेशन, इनक्यूबेशन अँड लिंकजेस् विभागाचे संचालक डॉ. गणेश काकंदीकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच प्राचार्य व कॅम्पस डायरेक्टर डॉ. कैलाश जगन्नाथ करांडे आणि उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांच्या मोलाच्या मार्गदर्शन व सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. त्यानंतर विद्यापीठ गीत व महाराष्ट्र गीत सादर करण्यात आले. शिक्षक दिनाचे महत्त्व तसेच दीक्षांत समारंभाची उद्दिष्टे यावेळी स्पष्ट करण्यात आली. उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी शिक्षकांचे महत्त्व, विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देण्यात शिक्षकांचे योगदान तसेच राष्ट्रनिर्मितीमध्ये शिक्षकांची महत्त्वपूर्ण भूमिका यावर मार्गदर्शनपर भाषण केले.
दीक्षांत समारंभामध्ये दीक्षांत समारंभ सुरू करण्याची औपचारिक घोषणा, शपथविधी आणि पदवी प्रमाणपत्र वितरण करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील हा महत्त्वपूर्ण टप्पा असून, व्यावसायिकता, प्रामाणिकपणा आणि सामाजिक जबाबदारीची मूल्ये जपत पुढील वाटचाल करण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना करण्यात आले.
त्यानंतर प्राचार्य डॉ. कैलाश करांडे यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आपल्या भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच त्यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक जडणघडणीत प्राध्यापक व पालकांनी दिलेल्या योगदानाचे कौतुक केले. भविष्यातील ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास, समर्पण आणि जबाबदारीने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
प्रमुख पाहुणे डॉ. गणेश काकंदीकर यांनी पदवीधर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना नाविन्यपूर्ण विचार, व्यावसायिक विकास, करिअरच्या संधी आणि बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात सातत्याने ज्ञान व कौशल्ये अद्ययावत ठेवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे बेस्ट टीचर अवॉर्ड.
उत्कृष्ट अध्यापन, समर्पण आणि विद्यार्थी विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल प्रा.अविनाश हराळे आणि प्रा. सोमनाथ झांबरे यांना बेस्ट टीचर अवॉर्ड प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राध्यापक, माजी विद्यार्थी, विद्यार्थी व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सामूहिक प्रयत्न महत्त्वपूर्ण ठरले. विशेषत: प्रा. माऊली खडतरे, प्रा.अतुल कुलकर्णी, प्रा.सर्जेराव महारनवर,प्रा.सौ. सोनाली गोडसे,प्रा.सौ.अंजली चांदणे, प्रा. संदीप लिंगे आणि प्रा. गणेश लकडे यांच्या सक्रिय नेतृत्व, समन्वय व सांघिक कार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचेही सहकार्य लाभले.
टीपीओ डॉ. समीर कटेकर यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन केले. तसेच प्रा. किरण पाटमासे सर यांनी विद्यार्थ्यांच्या सूत्रसंचालकांना मार्गदर्शन व सहकार्य करून कार्यक्रम सुरळीतपणे पार पाडण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
कार्यक्रमाची सांगता आभार प्रदर्शनाने करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
हा कार्यक्रम शैक्षणिक यश, शिक्षकांप्रती कृतज्ञता, सांघिक कार्य आणि पदवीधर विद्यार्थ्यांच्या नव्या व्यावसायिक प्रवासाचा शुभारंभ यांचा सुंदर संगम ठरला. या कार्यक्रमाची समन्वयक म्हणून जबाबदारी प्रा. माऊली खडतरे यांनी यशस्वीपणे पार पाडली. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल प्राचार्य कैलाश करांडे यांनी सर्वांचे कौतुक केले.
