६ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा वर्धापन दिन विशेष...
अखिल भारतीय ग्राहक पंचायत या ग्राहकांसाठी वाहून घेतलेल्या चळवळीला 52 वर्षे पूर्ण होत असून ६ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा वर्धापन दिन असून या दिवशी ग्राहक चळवळीचे प्रणिते बिंदू माधव तथा नाना जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून ग्राहक कायद्याचा जन्म झाला. अशा या ग्राहक चळवळीचा वर्धापन दिन सोलापूर जिल्हा ग्राहक पंचायत व पंढरपूर तालुका ग्राहक पंचायतीच्या वतीने रविवारी संपन्न होत आहे. संपूर्ण देशभरात अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे कार्य असून राज्य, जिल्हा, तालुका अशा विविध स्तरावर ही संघटना ग्राहकांसाठी आणि केवळ ग्राहकासाठीच काम करत आलेली आहे. संघटनेचे ध्येय धोरणे अमलात आणण्यासाठी ग्राहकांना समन्वय साधून काम करणे हे संघटनेचे वैशिष्ट्य आहे.
गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूर तालुक्यात अनेक मान्यवरांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहक पंचायतीचे कार्यकर्ते कार्यरत असून संपूर्ण जिल्हाभर अखिल भारतीय ग्राहक पंचायतचा ग्राहक आपत्ती कार्यकर्ता असल्यामुळे संघटनेचा आदरयुक्त दबदबा प्रशासनात आहे असे म्हणल्यास वावगे ठरणार नाही. पंढरपूर तालुक्याचा विचार केला तर पंढरपूर तालुक्यातील आत्तापर्यंत जे जे पदाधिकारी झाले त्यांनी ग्राहकाप्रती अनेक उपयोगी व सामाजिक प्रश्नाला हात घालून ग्राहकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली आहे. यातील महत्त्वाचे म्हणजे राज्यातील प्रसिद्ध असलेल्या पंढरपूर बस स्थानकाच्या सिमेंट काँक्रीटचा प्रश्न ग्राहक पंचायतीने धसाला लावून व्यवस्था करून घेतली त्याची व्यवस्था करून घेतली आहे. त्याचबरोबर एसटीमध्ये ग्राहकांसाठी सोयीसुविधा याकरता पाठपुरावा करत असतानाच एसटीच्या प्रवासाकरता येणाऱ्या अडीअडचणी सोडविण्यात याव्यात याकरता बस स्थानकात ग्राहक राजा दिनाची सुरुवात करण्यात आली. त्या माध्यमातून एसटीने प्रवास करणाऱ्या ग्राहक प्रवाशांच्या समस्या चे निराकरण करण्यात आले आहे. तसेच सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यामधून महावितरण अर्थात एम एस ई बी च्या कार्यालयामधून महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी ग्राहक तक्रार निवारण आयोजन करण्यात आले. हे अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे मोठे यश असून याकरता ग्राहक पंचायतीचे जिल्हाध्यक्ष शशिकांत हरदास पंढरपूर तालुका उपाध्यक्ष मामा देशपांडे व त्यांचे सहकारी यांनी यात मोलाचे सहकार्य केल्यानेच ग्राहकांच्या या माध्यमातून वाढीव बिले असो अथवा विजेचा प्रश्न असो अशा समस्या सोडवण्याकरता हा तक्रार निवारण दिनाच आयोजन करण्यास अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचा मोलाचा वाटा आहे.
