पंढरपूर चोफाळा येथे श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा

भगवान श्रीकृष्णांच्या जन्माचा आनंद साजरा करणारा श्रीकृष्ण जन्माष्टमीचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्याच प्रमाणे पंढरपूर येथील प्राचीन चौफाळा श्रीकृष्ण जन्माष्टमी सोहळा साजरी करण्यात येते आहे प्रेम,भक्ती,सत्य आणि कर्माचा संदेश देणाऱ्या श्रीकृष्णांच्या जन्मदिनी मंदिरांमध्ये विशेष पूजा,भजन-कीर्तन आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.
येथील प्राचीन श्री भगवान गोपाळ कृष्ण मंदिर चौफाळा पंढरपूर येथे जन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले असून मंदिरास आकर्षक विद्युत रोषणाई फुलाची सजावट केली असून भगवान श्रीकृष्ण मूर्तीस सुंदर असा पोशाख व फुलाची सजावट केली आहे तर पहाटे 4वा.महापूजा,सकाळी 6 पासून महाप्रसाद वाटप,दुपारी 1 वा.,गीतापठण दुपारी 3 ते 5 महिला भजनी मंडळ रात्री 10 वा. भजनी मंडळ,रात्री 12 वा. दहीहंडीचा कार्यक्रम असुन शनिवार ५ सप्टेंबर रोजी पोशाख पूजा आणि सत्यनारायण करण्यात येणार आहे तर रात्री 9 वा. एकतारी भजन असा सोहळा साजरा करण्यात येतो अशी माहिती सागर सुभाष वडवे,श्रीपीयूष रवी बडवे, संदीप संजय बडवे यांनी दिली आहे

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form