*पंढरपूर सिंहगडमध्ये विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी ‘सॉफ्ट स्किल’ प्रशिक्षण*

पंढरपूर : सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर येथे विद्युत अभियांत्रिकी विभागातील द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी तीन दिवसीय सॉफ्ट स्किल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणाबाबत महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी यांनी माहिती दिली. या प्रशिक्षणाचा एकूण ६० विद्यार्थ्यांनी लाभ घेतला. प्रशिक्षणाचे मार्गदर्शन अदिती सिंह यांनी केले. विद्यार्थ्यांच्या तांत्रिक ज्ञानासोबतच त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना देणे, संवादकौशल्य विकसित करणे आणि भविष्यातील रोजगाराच्या संधींसाठी त्यांना सक्षम बनवणे हा प्रशिक्षणाचा प्रमुख उद्देश होता. प्रशिक्षणामध्ये प्रभावी संवादकौशल्य, इंग्रजी संभाषण, टीमवर्क, नेतृत्वगुण, वेळेचे व्यवस्थापन, समस्या सोडविण्याची क्षमता, सकारात्मक दृष्टिकोन, बॉडी लँग्वेज, ग्रुप डिस्कशन, प्रेझेंटेशन स्किल्स तसेच मुलाखतीचे तंत्र यांसारख्या विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. विविध उपक्रम व प्रत्यक्ष सरावाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा सक्रिय सहभाग घेण्यात आला. या प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात वाढ होऊन संवादकौशल्य, नेतृत्वगुण आणि व्यावसायिक वर्तन विकसित होण्यास मदत झाली. भविष्यातील कॅम्पस प्लेसमेंट आणि उद्योगक्षेत्रातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. विद्यार्थ्यांना उद्योगाच्या गरजेनुसार तयार करण्यासाठी ट्रेनिंग प्लेसमेंट सेलतर्फे सातत्याने विविध कौशल्यविकास उपक्रम, तांत्रिक व सॉफ्ट स्किल प्रशिक्षण, ॲप्टिट्यूड प्रशिक्षण, मॉक इंटरव्ह्यू आणि प्लेसमेंटपूर्व मार्गदर्शन सत्रांचे आयोजन करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालयाकडून घेतले जाणारे हे प्रयत्न त्यांच्या रोजगारक्षमतेत आणि करिअरच्या संधींमध्ये वाढ करण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form