पंढरपूर, दि,21 :- राज्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी यांनी आज
श्री विठ्ठल- रुक्मिणी मातेचे दर्शन घेतले. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर
समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर यांनी श्रींची मूर्ती व उपरणे देऊन
त्यांचा सन्मान केला. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील,
प्रांताधिकारी सचिन इथापे, तहसीलदार सचिन लंगुटे, मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीण
कुमार घम, स्वेरी महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.बी.पी रोंगे तसेच मान्यवर पदाधिकारी
उपस्थित होते. 00000
