श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, कामोठे तर्फे चौक येथे वृक्षारोपण-

चौक वार्ताहर-(अनिल भरतुक) दि २४: वृक्ष वल्ली आम्हां सोयरी वनचरे" या संत तुकाराम महाराज, योच्या उक्ती प्रमाणे,
पर्यावरण दृष्टीने श्री स्वामी समर्थ गुरुपिठ,त्र्यंबकेश्वर नाशिक श्री गुरुमाऊली च्या प्रेरणेने श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र पर्यावरण विभाग कामोठे पनवेल तर्फे स्वामीज्ञ फाउंडेशन संस्थापक अध्यक्षा सौ अंजली अरुण घोडके यांच्या विशेष पुढाकाराने ३० सेवेकस्यांनी नेताजी पालकर मंडळाचे संघटक रायगड भूषण यशवत सकपाळ यांच्या शेताच्या बांधावर आंबा,फणस,चिबु, पेरु, औदुंबर, पिंपळ, बेल, कडू लिंब, आदि स्थानिक झाडे लावण्यात आली.
सदर प्रसंगी नेताजी पालकर व्यापारी संघाचे अध्यक्ष हर्षल हनुमंते, श्री स्वामी समर्थ केंद्र चौक चे राजेंद्र देशमुख,अरुण घोडके, इतिहास अभ्यासक अशोक मोरे, नेताजी सेवक अनिल खडागळे, मित सकपाक, मनिषा घाग, नवशा कातकरी यानी खुप मेहनत घेतली
स्वरुप कला नर्सरी तर्फे सर्व सेवेकरी यांना तुळशी,गुलाबाची रोपे देण्यात आली,आई तुळजाभवानी खानावळ चौक च्या सौ.लक्ष्मीबाई राजाराम घोडके यानी सर्व सेवेकरी यांना अल्पोपहार दिला. श्री स्वामी समर्थ गुरूपिठाच्चा या समाजोपयोगी उपक्रमा बद्दल यशवत सकपाळ यांनी आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form