*भारतीय समाजात संतांचे एक वेगळे स्थान आहे, संत आपल्या भक्तीने, ज्ञानाने, आत्मज्ञानाने, जगाच्या कल्याणाचा विचार करतात.*
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांनी शुद्ध भक्ती, तत्त्वावर अधिष्ठित असलेल्या उपासना मार्गाला, तत्विक अधिष्ठान मिळवून दिले, आणि महाराष्ट्रातील भागवत धर्माच्या भव्य मंदिराची पायाभरणी केली. *जनसामान्यांना भक्तीच्या एका सूत्रात गुंफून प्रपंचात राहूनच परमार्थ साध्य करण्याचे एक फार मोठे साधन, वारकरी संप्रदायाच्या रूपाने उपलब्ध झाले.*
*पंढरपूरचा विठ्ठल* हे या सांप्रदायाचे दैवत, गीता भागवत आणि उपनिषदे, यातील तत्त्व विचारांची गुंफण करून भागवत धर्माच्या रूपाने विठ्ठल या दैवता भोवती एक भक्ती संप्रदाय निर्माण झाला. महाराष्ट्राच्या याच भागवत धर्माला वारकरी संप्रदायाचे रूप प्राप्त झाले. विठ्ठल मूर्ती भोवती भागवत संप्रदायातील भक्ती भावनेचे धागेद्वारे गुंफून *महाराष्ट्रातील संतांनी विठ्ठल भक्तीच्या रूपाने सुरू केलेल्या या धर्म,नामसंकीर्तना मधून महाराष्ट्राची व्यापक अस्मिता जागी झाली.*
कष्टाशी एक हात सतत बांधला गेलेली माणसे प्रेरित झाली, आणि *महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाच्या रूपाने एक जन आंदोलन उभे राहिले, या जनआंदोलनात ज्ञानेश्वर नामदेवांच्या भोवती वयाने श्रेष्ठ संत गोरा कुंभार, संत नरहरी, सोनार, चोखामेळा, संत सेना महाराज, संत सावता माळी महाराज, संत तुकाराम महाराज, असा अठरा पगड जातीतील संत मेळा जमला.*
यापैकीच *सुवर्णकार समाजाचे श्रेष्ठ दैवत "संतश्रेष्ठ नरहरी महाराज".....*
वडील अच्युत बाबा, माता सावित्री कट्टर शिवभक्त, *भगवान शिवाच्या प्रत्यक्ष दिलेल्या साक्षात्काराने, शके १११५ श्रावण शुद्ध नवमीला प्रात् काळी कोर्टी पंढरपूर मध्ये नरहरी महाराज जन्मले*.
*सुवर्णकार समाजातील संत श्रेष्ठ महान श्री योगी "चांगदेव महाराज" यांनी बाल नरहरीची पत्रिका केली ....*
*सावित्रीबाईशी झालेसे आनंद*
*देई साखरपाण घरोघरी (१)*
*तुझीया पुत्राचे आयुष्य प्रमाण*
*ब्यान्नव वर्ष जाण चांगा म्हणे (२)*
*करील कौतुक शिवाचीये भक्ती*
*पांडुरंग चित्ति नाठवे मना (३)*
*ऐशी त्याची भक्ती, पाहून या देव*
*शिवाची अवयव दाखवी. (४)*
*तेव्हापासून करेल विठ्ठल भक्ती*
*अखंड निजचिती ध्यानीमनी (५)*
*चांगदेव म्हणे नरहरी जन्मला*
*वंश उद्धरीला अच्युतचा (६)*
*नरहरी महाराजांचा जन्म हरिहराचा वाद मिटवण्यासाठी झाला,* नरहरी महाराजांच्या घराण्याचे मूळ पुरुष आजोबा मुरारी, पंजोबा मुकुंद, वडील अच्युत बाबा आई माता सावित्री
नरहरी सोनार वडिलोपार्जित सुवर्ण काम करीत पत्नीचे नाव गंगा मंगळवेढा जवळील ब्रह्मपुरी गावच्या सानकस्य गोत्र श्रीपती पोतदार यांची मुलगी, त्यांना नाईक *पोद्दार हे उपनाम, दक्षिण भारतात पोतदार, हे "पत्तार" या शब्दापासून झाले, पूर्वी समाजात पोट शाखा नव्हत्या, समाज व्यापारासाठी इतरत्र गेला, तेव्हा काल देशपरत्वे खानपान राहणीमान बदलले, इतर जाती वर्णव्यवस्था झाली संपूर्ण समाज विश्वकर्मा ब्राह्मण समाजाच होता. "भगवान विश्वकर्मा दैवत"*
वडिलांप्रमाणेच कट्टर शिवभक्त पंढरपूर मध्ये राहून भगवान विठ्ठलाचे तोंडही पाहत नसत, शिवभक्त असलेले संत नरहरी सोनार यांना कटीबद्ध साक्षात्कारानंतर सर्वाभुती एक परमेश्वर, हा साक्षात्कार झाला. पांडुरंग परमात्मा शंकर भगवान आहे शिव आणि विष्णू भिन्न नाहीत एकच आहेत, सर्व देव परमात्मा विठ्ठलातच सामावलेले आहेत त्यानंतर ते विठ्ठल भक्तीतरमून गेले. त्यांनी विठ्ठल स्तुती पर अनेक सुंदर अभंगांची रचना केली, परंतु काळाच्या ओघात शिव आणि शैव भक्तीचे फक्त थोडेच अभंग आहेत.
*देवा तुझा सोनार, तुझे नामाचा व्यवहार*
उर्वरित आयुष्य व्यवसाय सांभाळून त्यांनी विठ्ठल नामात घालवले.
अनेक संतांनी नरहरी महाराजांचा महिमा सांगितला आहे.
*संत नामदेव महाराज.....*
*नरहरी सोनार पोतदार पंढरीचा*
*काय वाचा मने शिवभक्त*
*आडनाव महामुनी मूळ मेहेत्रे वतन*
*मिरासी दुकान महाद्वारी*
संत नरहरी महाराज संतांमध्ये वयोवृद्ध संत असल्याने इतर संत त्यांना महामुनी म्हणत, संत नामदेव महाराज, चांगदेव महाराज, यांच्या अभंगात यांचा उल्लेख आढळतो. *संतवाणी प्रमाणे संतश्रेष्ठ नरहरी महाराजांना ९२ वर्षाचे आयुष्य लाभले*.
*पंढरपूर मध्ये पांडुरंगाच्या मंदिरासमोरच शके १२०७ मध्ये त्यांनी समाधी घेतली.*
*नरहरी महाराजांचे समाधी अभंग प्रकरणातील एक अभंग.....*
*पार्थिव संवत्सरे शके बाराशते*
*तयावरी सप्ते वर्षे झाली* (१)
*रुखमादेवीवर नाम विठ्ठलराणा*
*नरहरी दुकान काम करी* (२)
*शुद्ध मास पौर्णिमेचा पाडवा*
*आठवले केशवा, दुःख मोठे (३)*
*संत नामदेव महाराज......*
*हाहाकार झाला, दानवीमानवी*
*ऋषी वृंदापाही देवादीका (१)*
*नरहरी बैसला हरीकटी स्थानी*
*पाहता लोचनी संत काळी (२)*
*खुणखूण व्यक्त खुणाचे ते व्यक्त*
*ते संत भाविक एकसरा (३)*
*नामा म्हणे, तेव्हा मी जवळी*
*नरहरी वनमाळी एक झाला (४)*
त्याकाळी समाधीचा खूप मोठा उत्सव झाला, साक्षात मायबाप विठ्ठल रुक्मिणी सहित संत नामदेव संत निवृत्ती संत चोखामेळा हे उपस्थित होते.
शेवटी...
*निवृत्तीने धरीले कर दोन्ही नरहरीचे*
*ज्ञानदेव हाती पूजीयले*
दहा दिवस कथा कीर्तन होते, समाधी पंढरपूर येथे विठ्ठल मंदिरासमोर महाद्वारात मल्लिकार्जुन मंदिराशेजारी आहे, सर्वात वयोवृद्ध संत म्हणून नरहरी महाराज यांना पाहिले जाते, आणि अंतसमयी ते ब्यान्नव वर्षाचे होते. तर संत ज्ञानेश्वर महाराज त्यावेळी बारा वर्षाचे होते, संत नामदेव महाराज बेचाळीस वर्षाचे होते.
*संतश्रेष्ठ नरहरी महाराजांना कोटी कोटी प्रणाम* 🙏🏻
स्वलिखित *संत नरहरी महाराज चरित्रामृत* पुस्तक लेखन चालू आहे 🙏🏻
🖊️
*श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण जि. सातारा फोन९९७०७४९१७७*
