प्रिय सोनार समाज बांधवानो,
सस्नेह नमस्कार.
*स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व समाज बांधवाना हार्दिक शुभेच्छा.*
भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात सोलापूर जिल्ह्याला,*हुतात्म्यांचे शहर* म्हणून ओळखले जाते. इंग्रज सरकारच्या विरोधात ऐतिहासिक लढा देऊन सोलापूर ने सर्वात आधी स्वातंत्र्य अनुभवले होते. अत्यंत अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट म्हणजे, सोलापूर च्या या धगधगत्या स्वातंत्र्य लढ्यात आपल्या *सोनार समाजाने* देखील प्राणांची बाजी लावली होती.
आज स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने, आपण आपल्या सोनार समाजाच्या खालील थोर स्वातंत्र्य सैनिकांच्या त्यागाला कोटी कोटी प्रणाम आणि अभिवादन करीत आहोत.
*स्वातंत्र्य सैनिकांना विनम्र अभिवादन.*
*स्वा. सै. हू. बाबुराव वेदपाठक पंढरपूर.*
*स्वा. सै. प्रल्हादराव कारीकर सोलापूर.*
*स्वा. सै. वसंतराव पालकर कराड /सोलापूर जिल्हा संलग्न.*
*स्वा. सै. श्रीधर पंडित सोलापूर.*
*स्वा. सै. नंदा जडे सोलापूर.*
*स्वा. सै. रामचंद्र पोतदार सोलापूर.*
*स्वा. सै. मधुकरराव वेदपाठक सोलापूर.*
*स्वा. सै. दत्तात्रेय पोतदार बार्शी.*
*एकमेव हयात स्वातंत्र्य सैनिकांला दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा व मानाचा मुजरा.*
*स्वा. सै. वसंतराव बळीराम पोतदार आलूरकर, सोलापूर.*
सोलापूर जिल्ह्यातील सोनार समाजाचे आणि संपूर्ण जिल्ह्याचे वैभव असलेले *आजच्या घडीला आपल्यात एकमेव हयात असलेले स्वातंत्र्य सैनिक.*!
श्रद्ध्येय श्री. वसंतरावजी मामा, आपल्या देश सेवेला आणि संघर्षाला संपूर्ण सोनार समाजाचा दंडवत. ईश्वर आपल्याला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य देवो, हीच या शुभ दिनी ईश्वर चरणी प्रार्थना.! आपल्या रूपाने आजची तरुण पिढी देश भक्तीची प्रेरणा घेत आहे.
*आजचे आवाहन.*
आपल्या पूर्वजांचा हा गौरवशाली इतिहास आपण पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवला पाहिजे. केवळ व्यवसायातच नव्हे तर शिक्षण, राजकारण आणि देशाच्या संरक्षणात आपल्या समाजाचा टक्का वाढवणे हीच या महान व्यक्तींना खरी श्रद्धांजली ठरेल. चला, संघटित होऊ या आणि एक सुदृढ व बलशाली समाज निर्माण करू या.
*एकच ध्यास, सोनार समाजाचा विकास.*
*जय हिंद! जय महाराष्ट्र.!*
विनीत :
*सोनार समाज संस्था, सोलापूर व तालुका शाखा पंढरपूर .*
( सर्व अग्रणी प्रवर्तक, सर्व पदाधिकारी व सर्व सदस्य )

