*कोर्टी येथील संत नरहरी महाराजांच्या मातापित्यांच्या समाधी स्थळी स्वच्छता व प्रवचन सेवा संपन्न*
*पंढरपूर:*
सुवर्णकार समाजाचे महान संत श्रेष्ठ नरहरी महाराज यांचे मातापिता *शिव उपासक वै. अच्युतबाबा* व *वै. सावित्री माता* यांचे पवित्र समाधी स्थळ *श्रीक्षेत्र कोर्टी, ता. पंढरपूर* येथे आज आध्यात्मिक व धार्मिक वातावरणात दर्शन व सेवा घेण्यात आली.
पधार्मिक क्षेत्राचे व वारकरी संप्रदायाचे अभ्यासक *श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक, साखरवाडी ता. फलटण जि. सातारा* यांनी सहकाऱ्यांसह समाधी स्थळाची प्रथमता स्वच्छता केली. त्यानंतर पंढरपूरच्या पवित्र *चंद्रभागा नदीच्या तीर्थाने जलाभिषेक* करून बेल, फुले वाहून पूजा करण्यात आली.
यावेळी *फलटण तालुका वारकरी संप्रदायाचे माजी अध्यक्ष ह.भ.प. प्रकाश पवार महाराज* यांनी समाधीवर प्रवचन सेवा केली. संत नरहरी महाराजांच्या चरित्रावरील अभंग गायन व आरतीने परिसर भक्तिमय झाला होता.
*ऐतिहासिक महत्त्व:*
भगवान शिवांचे अधिष्ठान असलेल्या या कोर्टी क्षेत्रात सुवर्णकार समाजाचे महान संत *विसोबा खेचर* आणि तपस्वी *चांगदेव महाराज* यांनीही अनेक वर्षे तपश्चर्या केली आहे. त्यामुळे हे स्थान सुवर्णकार समाजासाठी विशेष पवित्र मानले जाते.
यावेळी संत नरहरी महाराजांचे चरित्र लिहिण्याचा संकल्प करण्यात आला. उपस्थित भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
*याप्रसंगी उपस्थिती:*
ह.भ.प. प्रकाश पवार महाराज, ह.भ.प. गणेश भोसले महाराज, ह.भ.प. बबन पवार महाराज, त्रिंबक भोसले तसेच कोर्टी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सुंदर कार्यक्रम झाल्यामुळे सोनार समाज संस्था सोलापूर तालुका शाखा पंढरपूर चे उपाध्यक्ष तथा मराठी बाणा चे संपादक श्री. विनोद पोतदार यांनी श्री. रवींद्र वेदपाठक आणि सर्व मंडळींचे मनापासून कौतुक केले आहे.
कार्यक्रमाचे नियोजन *संत सेवक श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक, साखरवाडी* यांनी केले.
*संपर्क:* 9970749177

