*आषाढी कार्तिकी भक्तजन येती*
*चंद्रभागे माझी स्नान जे करिती*
*दर्शन हेळा मात्रे तया होय मुक्ति*
संतश्रेष्ठ नामदेव महाराज रचित पांडुरंगाच्या आरतीचे हे शेवटचे कडवे, संपूर्ण आरतीच तोंडपाठ नसणारा मराठी माणूस विरळाच,
मग तो विठ्ठल भक्त असो वा नसो या आरतीची महती आज शेकडे वर्षापासून महाराष्ट्र भूमी प्रत्येक मराठी मनाच्या गाभ्यात रुजलेली आहे, व तिचे बीज जोपर्यंत मराठी मनात आहे, तोपर्यंत पंढरपूर नगरी व तिचा स्वामी भगवान पांडुरंग घराघरात आपल्या अस्तित्वाची जागा कायम ठेवणार आहे.
अशा या विठ्ठल भक्तीच्या मळ्यात रुजलेल्या, व फुललेल्या, *वारकरी संप्रदायाचा पाईक म्हणजे वारकरी जो आपल्या ईस्ट देवतेच्या दर्शनासाठी वारंवार भक्तीभावाने आळंदी ते पंढरपूर पायी वारी करतो, तसेच प्रत्येक एकादशीची पंढरपूरची वारी करतो, तो वारकरी* वारी हा शब्द येरझारा करणे अशा अर्थाने वापरतात, महाराष्ट्रात अनेक लोक इतर देवतांची वारी करणारे आहेत, पण वारकरी हा शब्द पंढरपूरच्या विठोबाची वारी करणाऱ्या भक्तालाच लावण्याची प्रथा रूढ झाली आहे, वारकरी म्हणजे डोळ्यासमोर अशी व्यक्ती उभी राहते, जिच्या गळ्यात तुळशीची माळ चेहऱ्यावर अथवा कपाळावर नाम मुद्रा व बुक्क्याचा ठिपका हातात, भगवी पताका व मुखातून जय जय राम कृष्ण हरी हा मंत्रोचार होत असतो. दोन वारकरी जर वाटेत एकमेकांना भेटले किंवा अवचित गाठ पडली तर, ते नुसता नमस्कार न करता एकमेकांच्या पायावर डोके टेकवतात, वारकरी पंथ हा जरी भक्ती प्रदान असला तरी,
*जे जे मानी भूत ते ते भगवंत*
हाच वारकरी पंथाचा संदेश आहे.
व्यास कृत भागवत ग्रंथ हा श्रीमद्भगवद्गीतेप्रमाणेच वारकरी पंथास पूज्य आहे.
*गीता, भागवत, करिती श्रवण*
*अखंड चिंतन विठोबाचे*
*युगे अठ्ठावीस विटेवर उभा*
*कर कटावर ठेवूनिया*
अनंत काळापासून भक्तांच्या भेटीस असलेला विठोबा कर कटेवर ठेवून विटेवर उभा आहे आणि पुंडलिका भेटी परब्रम्ह आलेगा विठ्ठलाचा महान भक्त पुंडलिकाच्या भेटीसाठी प्रत्यक्ष त्याचे दैवत आले असता देवतुल्य माता पित्यांची सेवा करीत असणारा भक्तराज पुंडलिक एक वीट देवाच्या समोर सरकवीत देवाला सांगता झाला, देवा काही काळ या विटेवर उभा राहून माझी वाट बघा, देवालाही तिष्ठत ठेवावे. यावरून इतकाच बोध होतो, की देव आणि भक्त, विभक्त नसून एकाच चिन्मय ज्योतीचा प्रकाश आहे. आजही पांडुरंग भक्ताची वाट पाहत विटेवरी उभा आहे.
आषाढी कार्तिकीस अनेक भक्त शेकडो महिलांची पायपीट करून हरिनामाच्या गजरात आपल्या इष्ट देवतांचे दर्शनासाठी सर्व अमंगल भेदभाव विसरून वारी करतात ही नुसतीच भक्ती नसून अद्वैथातून उमल देदे समाजसेवेचे व समाजप्रबोधनाचे पुष्प महाराष्ट्रात उमलले आहे आणि या पुष्पाचे बीज पंढरपूर वाशी पांडुरंगाच्या नाभीत आहे
वारकरी पंत हा जसा विठ्ठल भक्तांचा आहे तसाच तो इतर सर्व देवांचाही आदर करतो शेवटी प्रत्येक वारकऱ्यांच्या मुखातून तुकाराम महाराजांचा एक अभंग सहजपणे उच्चारला जातो
गात गात जगा प्रेम मागा.... विठ्ठला
*जय जय राम कृष्ण हरी*🙏🏻
✒️
*रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता फलटण जि सातारा* *फोन.९९७०७४९१७७*
