*आज पालखीचा मुक्काम भंडीशेगाव* *आळंदी ते पंढरपूर पायी वारी, संतांची अभंग वाणी, संत नरहरी महाराज*

*जग हे अवघे, सारे ब्रह्म रूप* *सर्वानभूती एक पांडुरंग* *अणु रेणू पर्यंत, ब्रह्म भरीयले* आजच्या निरूपण सेवेसाठी घेतलेला *अभंग संतश्रेष्ठ नरहरी महाराज....* यांचा असून, महाराजांनी आपले अभंगातून भगवान पांडुरंगाचे वर्णन केले आहे. तोच सर्वाठायी भरला आहे, असा साक्षात्कार झाल्यावर *सर्वठायी ठायी देखील तोच आहे*, अनन्य भक्तीचा विपरीत अर्थ करून धर्माधर्मात, भांडण लागू नयेत, असे प्रयत्न संतांनी केलेले दिसतात शैव, वैष्णव, एकत्र यावेत हरिहर भेद नाही. असे प्रतिपादन संतांनी वारंवार केले आहे, शैव वैष्णवांचा कट्टरपणा कोणत्या थराला गेला होता, त्याचे निराकरण पंढरीनाथाच्या दर्शनात कसे झाले, त्यांच्या कथा संत चरित्रात पाहायला मिळतात. *संत नरहरी महाराज आपल्या या अभंगातून सांगतात,* वास्तविक सर्व व्याप्त परमेश्वरच आहे, असे म्हटल्यावर सर्व देवता एकाच परमेश्वराची रुपे आहेत हे वेगळे सांगायला नको, प्रत्येकाला आपल्या आवडीप्रमाणे आपले ईस्ट देवता निवडता यावेत, यासाठी विविध देवतांची सोय करण्यात आली. पण सर्व प्रवाह जसे शेवटी सागराला जाऊन मिळतात, त्याप्रमाणे सर्व देवतांचे भजन हे शेवटी त्या पांडुरंग परमात्म्याचे भजन असते. अणु रेणूनी पांडुरंग भरलेला आहे, तो सर्व व्याप्त आहे, बांगड्या, हार, अंगठी,नथ, असे दागिन्यांचे अनेक प्रकार असतात, पण सर्व दागिने सोन्याचेच असतात म्हणजे प्रत्येकात सोने आहे, फक्त नावे वेगळी, भगवान पांडुरंग म्हणतात मी सर्व व्याप्त आहे, म्हणजेच मी सगळीकडे आहे, *या परमात्म्याला अनन्यसाधारण भक्तीने शरण गेल्याने जन्ममरणाचे निवारण होते* जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्या अभंगातून म्हणतात ... *जेथे जेथे जाशी तेथे मजसी तू पहाशी* *ऐसा पसरीन भाव, रिता नाही कोणी ठाव* तुकाराम महाराज मनाला सांगतात अरे मना तू जेथे जाशील, तेथे मलाच ब्रह्मरूपाने व्यापक असलेला पाहशील, असा मी सर्व व्यापक विस्तारित भाव त्यामुळे विश्वातील कोणतेही स्थान रिकामे राहणार नाही, त्यामुळे ज्या ठिकाणी माझा शोध करशील, त्या त्या ठिकाणी तु मलाच पाहशील, अशा या सर्व व्याप्त परमेश्वराची एकरूप होऊन सेवा करणे, मनोमन भक्ती करणे, हे भक्ताचे कर्तव्य, हा सरळ सरळ अभंगांचा भावार्थ. अशा या सर्व व्यक्त परमेश्वराची एकरूपत्व पावण्यासाठी, सातत्याने तशी भावना करणे, हा वैष्णवांचा धर्म आहे. *विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ* *........राम कृष्ण हरी.......🙏🏻* ✒️ *श्री. रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण जि. सातारा फो. ९९७०७४९१७७*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form