सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा वाखरी पालखी तळ स्वच्छता अभियानात उत्स्फूर्त सहभाग

पंढरपूर: आषाढी वारीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरकडे येत असताना स्वच्छ, सुंदर आणि निरोगी वारीचा संदेश देण्यासाठी एस. के. एन. सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, कोर्टी, पंढरपूर येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागाच्या स्वयंसेवकांनी वाखरी पालखी तळ येथे स्वच्छता अभियान 27 जुलै 2026 रोजी राबवून उल्लेखनीय सामाजिक योगदान दिले. या अभियानामध्ये स्वयंसेवकांनी पालखी तळ परिसराची स्वच्छता, प्लास्टिक व कचरा संकलन, परिसर स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती तसेच वारकऱ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्याचे कार्य केले. "स्वच्छ वारी – सुंदर वारी" हा संदेश देत विद्यार्थ्यांनी सेवाभाव, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाची जाणीव समाजापर्यंत पोहोचवली. या उपक्रमामुळे पालखी तळ परिसर अधिक स्वच्छ व सुस्थितीत राहण्यास मदत झाली. वारकरी, स्थानिक नागरिक तसेच प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या सेवाभावी कार्याचे कौतुक केले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. चंद्रकांत देशमुख, समन्वयक प्रा. अर्जुन मासाळ आणि प्रा. अजित करांडे यांनी स्वयंसेवकांचे अभिनंदन करत समाजसेवा, पर्यावरण संरक्षण आणि स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारावी, असे आवाहन केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे ब्रीदवाक्य "Not Me But You" प्रत्यक्ष कृतीतून साकार करत सिंहगडच्या विद्यार्थ्यांनी वाखरी पालखी तळ येथे राबविलेले स्वच्छता अभियान हे सामाजिक उत्तरदायित्व आणि सेवाभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरले

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form