आषाढी वारी नंतरची स्वच्छता मोहीम

स्वच्छता कर्मचारी यांच्या सह मुख्याधिकारी व नगराध्यक्ष
पंढरपूर प्रतिनिधी -- आषाढी वारी सोहळा 2026 पार पडल्यानंतर प्रशासनाची खरी कसोटी असते. वारी सोहळा निर्विघ्नपणे पार पडल्यानंतर पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने शहरात जोरदार स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. दररोज मोठ्या प्रमाणावर कचरा संकलित करण्यात येत आहे. यासाठी स्वच्छता कर्मचारी रात्रंदिवस झटत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंढरपूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा डॉ. प्रणिता ताई भालके, मुख्याधिकारी श्री. महेश रोकडे त्याचप्रमाणे सर्व सभापती, नगरसेवक, नगरपरिषदेचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी हे या स्वच्छता मोहीमेत सहभागी झाले आहेत. नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने शहरात आता निर्जंतुकीकरण धूर फवारणी, तसेच जंतुनाशक फवारणी यावर जोर देण्यात येत असून शहरात सर्वत्र फवारणी सुरू करण्यात आली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form