आषाढी यात्रेनंतर पंढरपूरमध्ये महास्वच्छता मोहीम* *नगराध्यक्षा डॉ.प्रणिताताई भालके

स्वच्छता मोहिमेत उत्स्फूर्त सहभाग,स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला
पंढरपूर | प्रतिनिधी - आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांनी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेतले. यात्रा संपल्यानंतर स्वच्छ, सुंदर आणि निरोगी पंढरपूर घडविण्यासाठी *पंढरपूर नगरपालिकेच्या वतीने महास्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत नगराध्यक्षा सौ. डॉ.प्रणिताताई भागीरथ भालके यांनी स्वतः सहभागी होत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढविला आणि शहरातील स्वच्छता व्यवस्थेची पाहणी केली.* यात्रेनंतर 65 एकर परिसर, शहरातील प्रमुख रस्ते, मंदिर परिसर, घाट परिसर व सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता करून कचरा हटविण्यात आला. *“स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर” हा संकल्प घेऊन शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत.*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form