*भक्ती आणि कलेचा अनोखा संगम* *संतश्रेष्ठ गोरा कुंभार*

*बाराव्या शतकातील संत गोरा कुंभार हे संत ज्ञानेश्वर व नामदेवांच्या प्रभावळीतील एक श्रेष्ठ संत, त्यांचा जन्म शके ११८९ म्हणजेच १२६७ साली तेर (ढोकी ) येथे झाला, वडिलांचे नाव माधव बुवा आणि आई रखुमाई आई वडील अत्यंत धार्मिक कृतीचे होते*, तेच संस्कार त्यांच्यावर झाले परंपरेने त्यांच्या घरात विठ्ठल भक्ती होती, काम करत करत घरात अखंड हरिनाम चालू असे, त्या काळात निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान देव, जनाबाई, मुक्ताबाई, आधी संतांमध्ये ते वयाने मोठे असल्यामुळे त्यांना गोरोबा काका असे म्हणत, लहानपणापासून गोरोबा काकांवर तेच संस्कार झाले, तेही काम करत करत अखंड हरिनाम मुखात असे. त्यांच्याबद्दलची आख्यायिका सगळ्यांना माहीतच आहे, गोरोबाकाका विठ्ठल भक्तीत त्यांनी स्वतःचा लहान मुलगा चिखलात तुडवला गेला, त्यांच्या पत्नीने हे पाहिले ते अद्वातद्वा बोलू लागली तेव्हा गोरोबा तिच्या अंगावर धावून गेले, तेव्हा पत्नी म्हणाली माझ्या अंगाला हात लावाल तर तुम्हाला विठ्ठलाची शपथ आहे. गोरोबाकाकांनी पण केला इथून पुढे पत्नीच्या अंगाला स्पर्श करायचा नाही, एके दिवशी अजाणतेपणाने गोरोबांचा पत्नीला स्पर्श झाला, त्यावेळी स्वतःचे दोन्ही हात कलम करून त्यांनी स्वतःला शिक्षा करून घेतली, घेतलेली शपथ मोडल्यामुळे गोरोबांनी स्वतःला शिक्षा करून घेतली होती. काही दिवस उलटल्यानंतर असेच एकदा हे कुटुंब एकादशी वारी निमित्त पंढरपूरला गेले, सर्वांनी चंद्रभागे स्नान केले, पुंडलिकाचे दर्शन घेऊन ते विठ्ठल मंदिरात आले, विठ्ठलाचे दर्शन झाले, परत ते सभामंडपात आले, तेथे संतश्रेष्ठ नामदेव महाराजांचे कीर्तन चालू होते, तेथे श्रोत्यात बरीच मंडळी होती नामदेवांच्या निरूपणानंतर शेवटी नामस्मरणाचा गजर सुरू झाला, लोक टाळ्या वाजवू लागले गोरोबांना मात्र टाळ्या वाजवता येत नव्हते, पण त्यांना रहावे ना ते आपले दोन्ही छोटे हात वर करून नाचू लागले, आणि मुखाने विठ्ठलाचे नामस्मरण करू लागले, आणि चमत्कार घडला, गोरोबांच्या दोन्ही हातांना बोटे फुटली, थोड्याच वेळात गोरोबांचे हात पुर्ववत झाले, त्यावेळी त्यांच्या पत्नीने पांडुरंगाची करुणा भाकली आणि पांडुरंगाची प्रार्थना ऐकली आणि गेलेले बाळ रांगत रांगत आले, गोरोबांच्या कुटुंबात नवचैतन्य निर्माण झाले, गोरोबा पुन्हा प्रपंचाकडे वळले, याचा अर्थ गोरोबा काकांच्या जीवनात ज्या अद्भुत घटना घडल्या चमत्कार घडले याचा अर्थ असा की भक्ती करून त्यांनी पांडुरंगाची नाते जोडले ते विरक्त झाले, याचा अर्थ प्रपंचाचा त्याग केला, नित्य नाम केले, चमत्काराचा जसा च्या तसा अर्थ न घेता लक्षणीय अर्थ घेतला पाहिजे, गोरोबा विठ्ठलाचे निषेब्ध भक्त होते, मडके घडवण्याची माती तुडवत तुडवत त्यांचे सतत नामसं किर्तन चालू असे, *संतश्रेष्ठ नामदेव महाराज, विठ्ठलाशी नेहमी भांडण करत, म्हणून विठ्ठलाने ही त्यांना ज्ञान प्राप्ती व्हावी, म्हणून तत्कालीन संतांकडे पाठवले,* त्यामध्ये गोरोबाकाकाही होते, नामदेव महाराजांना पांडुरंगाचा राग आला, मग गोरोबा काकांना बोलावणे धाडले गेले, हे मडके कच्चे आहे, का भाजलेला आहे, याची परीक्षा आपण करावी, व त्याचा अभिप्राय आम्ही मानू असे मुक्ताबाई म्हणते. संतांच्या विनंतीला मान देऊन गोरोबाकाका संत सभेत आले, *गोरा बोलवला जुनाट पै जुना* *हाती थोपटने अनुभवाचे* " गोरोबा काका हे वयोवृद्ध, ज्ञानीआहेत, त्यांच्या हातामध्ये स्वानुभवाचे थापटणे आहे, परब्रम्ह स्वरूपाच्या प्राप्तीचे त्यांचे अंतकरण शांत झाले आहे, व आरोग्य संपन्न जीवन आहे, ते परब्रम्ह हे आहेत, अशा अनुभवाने अवघे आसमंत भरून गेले होते. पहिल्यांदा निवृत्तीने त्यांच्या डोक्यावर थापडले हा डेरा पक्का भाजला आहे, परब्रम्ह स्वरूपाला प्राप्त झाला आहे, अशी ग्वाही गोरोबा काकांनी दिली नंतर थापटने ज्ञानेश्वरांच्या डोक्यावर थापटले, त्या ठिकाणी कोणतेही उणेपण कोरडे पण त्यांना दिसले नाही, त्यानंतर मुक्ताबाईचे मस्तकावर थापटले, त्यावेळी जणू काही अमृत संजीवनीच उफाळून वर आली, देवदानवांनी क्षीरसागराचे मंथन केले, त्यातून चवदार रत्न प्राप्त झाले, असा धन्वंतरी अमृत संजीवनाचा कलश घेऊन प्रगट झाले अशी कथा आहे, *गुरुत्वाला जिवंत करणे हे अमृताचे कार्य अज्ञानीला ज्ञानी करणे, हे संतांचे अमृतमय कार्य करण्याची पात्रता मुक्ताबाईच्या ठिकाणी आहे*. संत नामदेवांजवळ येऊन गोरोबांनी त्यांच्या डोक्यावर थापटणे, हलते ते देहातीत झाले नव्हते, म्हणून त्यांना ते दुःख सोसवले नाही, नामदेव महाराज डोळे सोडून रडू लागले, गोरोबा काकांनी निकाल दिला नामदेवांचे मडके कोरेच आहे थोडे सुद्धा भाजलेले नाही, नामदेव महाराजांनी संतांना शरण गेल्याशिवाय परमात्म्याची प्राप्ती होत नाही, असे त्यांना सांगितले नामदेवरायांचे भाग्य असे की नामदेवा तू सद्गुरुला शरण जा, असा आदेश खुद्द पांडुरंगाने दिला, त्याप्रमाणे त्यांना सद्गुरु ची प्राप्ती झाली. वास्तविक कुंभार समाज हा अत्यंत गरीब,कष्टकरी, समाज मातीची भांडी व कलाकृती बनवणे, हा त्यांचा पारंपारिक व्यवसाय, बारा बलुतेदारापैकीच एक प्रमुख घटक मातीला आकार देऊन उपयुक्त वस्तू तयार करणे, भांडी तयार करणे, हा त्यांचा मुख्य व्यवसाय केवळ मातीची भांडी नाहीतर गौरी गणपती, बैलपोळ्यातील बैल, पारंपरिक प्रत्येक सन समारंभात कुंभार समाजाला खूप मोलाचे स्थान आहे. मातीला आकार देऊन एक उपयुक्त वस्तू तयार करणे, ही त्यांची ओळख *संत गोरा कुंभार हे त्यांचे आराध्य दैवत* 🙏🏻 ✒️ *श्री रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण जिल्हा सातारा. फो ९९७०७४९१७७*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form