*देव दाखविणारा गुरु कोठे..*

सद्गुरु वाचून खऱ्या देवाची ओळख होणार नाही, हे खुद्द भगवंतांनी नामदेवरायांना सांगितले, नामदेवराव काहीसे गोंधळून गेले, सद्गुरूंचा शोध घ्यायचा कसा ? *देव दाखवा ऐसा नाही गुरु* *जिथे जाय तेथे दगड शेंदूर* *देव देव करता शिंणले माझे मन* *जेथे जाय तेथे पूजा पाषाण* आपणाला देवापर्यंत पोहोचवणारा गुरु कोठे सापडेल, जेथे जावे तेथे दगडाला शेंदूर फासून त्याला देव मानणारे त्यांना दिसले, नामदेवराव कंटाळून गेले, पण त्यांना सद्गुरु भेटना, भगवंतांना म्हणाले देवा अनाथाचा नाथ, हे तुझे ब्रीद आहे, मी आपणाला शरण आलो, आपणच योग्य मार्गदर्शन करा, देव म्हणतात, नाम्या विसोबा खेचराला शरण जा ! हा विसोबा खेचर कोण ? ज्ञानेश्वर माऊली व त्यांची भावंडे, यांचा ज्याने अतोनात छळ केला तो, पुढे त्याला आपली चूक उमगली, त्याचा दृष्टपणा नष्ट झाला, एवढेच नव्हे तर तो संतपदावर आरूढ झाला. देवांची आज्ञा होताच नामदेवराय त्यांचा शोध घेण्यासाठी घराबाहेर पडले, नामदेवराय आवंढ्याच्या देवळात आले, समोरील दृश्य पाहून ते आश्चर्यचकित झाले, *देवावरी पाय ठेवून खेचर, निजला परीकर निवांतची* भगवान शंकराच्या पिंडीवर एक पाय ठेवून निवांत झोपले होते, असा हा विक्षिप्त प्राणी, विसोबा खेचर आहे, हे नामदेवरायांना माहीत नव्हते, नामदेवरायांना राग येतो, उठ उठ तू आंधळा आहेस की काय ? देवावर पाय ठेवतोस, विसोबा खेचर यांनी डोळे उघडून पाहिले, ते नामदेवांना म्हणतात तू भला माणूस दिसतोस, पण मला तुझा देव कळला नाही, तू सर्वज्ञ आहेस, जिथे देव नाही तिथे पाय ठेव पाहू, मी पणा यामुळे मला काही कळेनासे झाले, देव नाही, अशा ठिकाणी तूच माझे पाय ठेव, *खरे सद्गुरु आत्मज्ञान व शब्दज्ञान या दोन्हीत पारंगत असतात, पण सद्गुरु आत्मज्ञान देतात ते शब्दातून नाही, तर ते शिष्याला विचार करायला लावतात, दिशा दाखवणे हे सद्गुरूंचे काम* नामदेवरायांना कळून चुकले, या भुतलावर भगवंत नाही अशी एकही जागा नाही, मी आपणास शरण आलो, आपले नाव सांगा, विसोबा खेचारांनी आपला परिचय दिला, नामदेवराव यांनी त्यांच्या पायाशी लोटांगण घातले, भगवंताने आपली भेट होण्याचे सांगितले, मी आपणास शरण आलो आहे, मला भगवंतापर्यंत पोहोचण्याची वाट दाखवा चिकित्सक नरेंद्र यांनीही गुरूंचा असा शोध घेतला होता, आपल्याला अध्यात्मक ज्ञान प्राप्त आहे, व मला आत्मसाक्षात्कार झाला आहे, असे सांगणारे कोणी साधू संन्याशी यांना नरेंद्र भेटला की त्यांना एकच प्रश्न विचारीत, *महाराज आपण देव पाहिलाय का ? आणि आपण मला दाखवू शकता का ? त्याच्या या प्रश्नाने भल्याभल्यांची गाळण उडे*, *परंतु रामकृष्णांनी नरेंद्राला देव दाखवला, तेच नरेंद्र चे स्वामी विवेकानंद झाले.* अशाप्रकारे नामदेवरायांना विसोबा खेचर गुरु भेटले, व त्यांनी *मनुष्य जन्माचे कल्याण करून, भगवंतापर्यंत जाण्याचा भक्ती मार्ग दाखविला.* ,*जय जय राम कृष्ण हरी*🙏🏻 ✒️ *श्री रविंद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता. फलटण जि. सातारा फो.९९७०७४९१७७*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form