नागेश फाटे यांच्या हस्ते प्रतिमापूजन; विविध मान्यवरांची उपस्थिती
पंढरपूर / प्रतिनिधी
राज्यभरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख दिवंगत उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध सामाजिक व जनहिताचे उपक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पंढरपूर येथील श्री विठ्ठल अर्बन को-को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड पंढरपूर यांच्या वतीने स्व. अजित पवार यांची जयंती श्रद्धापूर्वक साजरी करण्यात आली.
यावेळी संस्थेचे संस्थापक चेअरमन नागेश फाटे यांच्या हस्ते स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. उपस्थितांनी त्यांच्या कार्याचा गौरव करत समाजहितासाठी केलेल्या योगदानाचे स्मरण केले. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या हितासाठी कार्य करण्याचा संकल्पही यावेळी व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला संस्थापक चेअरमन नागेश फाटे यांच्यासह नवनाथ बचूटे, रमेश फाटे, पंचायत समिती सदस्या सायली गायकवाड, बाळासाहेब देशमुख, संग्राम कापसे, पांडुरंग पवार, नवनाथ फाटे, शुभम फाटे, विनय शिंदे, निवृत्ती भटकर, योगेश फाटे, सुमित बागल, श्रीधर पिसे, शशांक फाटे, शरद थिटे, मोनेश्वर रोपळकर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे वातावरण अत्यंत भावपूर्ण होते. उपस्थितांनी स्व. अजित पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन समाजोपयोगी उपक्रम अधिक व्यापकपणे राबविण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
