अवघाची संसार सुखाचा करीन आनंदे भरीन तिन्ही लोक जाईन गे माय तया पंढरपुरा भेटीने
माहेरा आपुलीया प्रस्तुत सेवेकरता घेतलेल्या अभंग *संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर
महाराजांचा असून,* त्यांनी या अभंगात संपूर्ण विश्वाच्या संसार सुखाचा करण्याच्या
कल्याणाची प्रार्थना केलेली आहे, आणि सर्वांचा संसार सुखाचा करीन ही ग्वाही दिली
आहे. माऊलींनी आपल्या अनेक अभंगातून विठ्ठलाचे स्मरण करावे, म्हणून विठ्ठल नामाचे
महत्व सांगितले आहे, लोकांमध्ये विठ्ठल नामाची आवड निर्माण व्हावी म्हणून त्यांनी
तुमच्या प्रपंचासाठी मी भगवान पांडुरंगाला साकडं घालणार आहे, विठ्ठलानेच आपल्याला
सर्व काही भरपूर दिल्यावर त्याच्याविषयी कृतज्ञता वाटून आयुष्यभर त्याच्या नामात
राहिला तर ज्ञानेश्वर महाराज सांगतात कृतज्ञ साधकाने त्याच्या साक्षीने आपला
प्रत्येक श्वास घ्यावा अशी जाणीव ज्ञानदेवांनी करून दिली आहे. विठ्ठल आपल्या
भक्तांची वाट पाहत पंढरपुरात उभा आहे, एका विठ्ठलाशिवाय सर्वच व्यर्थ वाटते, अन्य
गोष्टी पुन्हा संसारात अडकवून ठेवायला कारणीभूत ठरतात. बाप रखुमादेवीवरा विठ्ठलाची
भेटी कृतज्ञ भावाने ज्ञानदेव महाराज म्हणतात, मी पूर्वजन्मी फार मोठे पुण्य केले
असले पाहिजे, त्यामुळे आज मला त्याचे फळ मिळत आहे. आज माझ्या मनाला परमानंद झालाय,
विठ्ठल भेटीमुळे वडील भाऊ-बहीण सेगेसोयरे यांचाही विसर पडला आहे, याच्या सहवासाने
अमृता पेक्षा मधुर व गोड काही घेतल्याचा आनंद मिळतोय हा संतांच्या भेटीचा योग केवळ
रखुमाई पती बाप श्री विठ्ठलाच्या कृपेने लाभला. त्यांच्या कृपेने आपला सर्वांचा
संसार सुखाचा करण्याची प्रार्थना पांडुरंगा चरणी केली आहे. ✒️ *श्री. रविंद्र
परशुराम वेदपाठक साखरवाडी. ता. फलटण. जि. सातारा. फो.९९७०७४९१७७*
