*गुरू महती सांगणारा माऊलींचा अभंग*

*अभंग सेवा* *श्री गुरु सारखा असता पाठीराखा* *इतरांचा लेखा कोण करी* *राजयाची कांता काय भीक मागे* *मनाचीया जोगे सिद्धी पावे* *कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला* *काय वाणी त्याला सांगिजोजी* *ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो* *आता उध्दरलो गुरुकृपे* *संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांचा गुरुची महती सांगणारा सुंदर अभंग* *अभंगाच्या भावार्थ......* अध्यात्माच्या क्षेत्रात सद्गुरूंना फार महत्त्व आहे, त्यात भगवंताची भक्ती घडायला सर्वात महत्वाची गोष्ट सद्गुरूंचे मार्गदर्शन व त्यांची सेवा हवी, भक्तीसाठी तर सद्गुरु हवाच, ते भक्तीने आधार बनुन जातात. साधनेमध्ये वाट दाखवायला ते हवेतच, रस्त्याने जाताना एका विशिष्ट ठिकाणी दोन तीन गावे जाणारे रस्ते फुटतात तसेच साधनेतही, वाटा फक्त पोलीस मार्गदर्शन करून आपल्याला ज्या गावी जायचे आहे तो रस्ता दाखवतो, तसेच सद्गुरु जेथे साधनेच्या वाटा फुटतात तेथे उभे असतात ते नेमका मार्ग दाखवतात. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांना असाच योग्य मार्ग सद्गुरु श्री निवृत्तीनाथांनी दाखवला असल्याचे त्यांचे विषयी कृतज्ञता प्रकट करत आहेत, साधनेत निशंकपणा येण्यासाठी श्री गुरूंच्या अनुग्रहाची आवश्यकता असते, सद्गुरु कृपेमुळे अनुसंधानाची वाढ होते, अभिमान वृत्त क्षीण होते, ईश्वराच्या अस्तित्वाची जाणीव होते, सद्गुरू सारखा पाठीराखा असेल तर कशाचीही कमतरता पडत नाही. ज्याप्रमाणे राजाच्या राणीला काय कमी असते काय ? तिला कोणाजवळही हात पसरण्याची गरज भासत नाही, सर्व ऐश्वर्य तिच्या पायाशी लोळण घेत असतात, एखाद्या कल्पतरूच्या वृक्षाखाली बसलो असता, आपण जे मागेल ते, मनात इच्छा येईल ते, आपल्यासमोर हजर होते. त्याप्रमाणे माऊली म्हणतात मी गुरुकृपेमुळे म्हणजे संतश्रेष्ठ निवृत्ती नाथांमुळेच या भक्ती सागरात तरलो आहे, आत्ता मला कशाचीही कमतरता नाही. *सद्गुरुसारिका सोयरा सज्जन* *दाविले निदान वैकुंठीच* *सद्गुरु माझा जीवाचा जिवलग* *फेडियला पांग प्रपंचाचा* *सद्गुरू माऊलींनी कृपेची सावली धरल्यामुळे माजी साधना सफल झाली, त्या सद्गुरूंना माझे कोटी कोटी प्रणाम.* *जय जय राम कृष्ण हरी* 🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🪷🙏🏻 ✒️ *श्री.रवींद्र परशुराम वेदपाठक साखरवाडी ता फलटण जि सातारा फो.९९७०७४९१७७*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form