वार्षिक सहा लाखाचे पॅकेज
कोर्टी (ता. पंढरपूर) : येथील एसकेएन सिंहगड कॉलेज ऑफ
इंजिनियरींग मधील संगणक अभियांत्रिकी विभागाची विद्यार्थीनी साक्षी संभाजी गवळी
याची प्रतिष्ठित सॉप्टवेअर कंपनीत कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाली आहे. तीला
वार्षिक ६ लाख रुपयांचे आकर्षक वेतन पॅकेज मिळाले असून तीच्या या यशाबद्दल
महाविद्यालय परिसरात आनंदाचे वातावरण आहे. महाविद्यालयामार्फत विद्यार्थ्यांना
रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रथम वर्षापासूनच नियोजनबद्ध प्रशिक्षण दिले जाते.
तांत्रिक कौशल्य विकास, प्रोग्रामिंग सराव, अभिक्षमता चाचण्या, तार्किक
विचारक्षमता, इंग्रजी संवादकौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास, गटचर्चा आणि मॉक
इंटरव्ह्यू यांसारख्या उपक्रमांचे नियमित आयोजन केले जाते. तसेच उद्योगतज्ज्ञांची
व्याख्याने, करिअर मार्गदर्शन सत्रे, लाइव्ह प्रोजेक्ट्स, इंटर्नशिप संधी आणि
प्लेसमेंट-केंद्रित प्रशिक्षण कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्राच्या
अपेक्षांनुसार तयार केले जाते. या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा लाभ घेत साक्षी गवळी
हिने यार्डी सॉप्टवेअरच्या निवड प्रक्रियेत उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले.
महाविद्यालयातील ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या मार्गदर्शनामुळे तिला कॅम्पस
मुलाखतीत यश मिळाले. यार्डी ही अमेरिकास्थित जागतिक स्तरावरील सॉफ्टवेअर कंपनी असून
रिअल इस्टेट, प्रॉपर्टी मॅनेजमेंट, गुंतवणूक व्यवस्थापन आणि व्यावसायिक मालमत्ता
व्यवस्थापनासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाधारित सॉफ्टवेअर सोल्युशन्स विकसित करते.
कंपनीची स्थापना १९८४ मध्ये अनंत यार्डी यांनी केली असून कंपनीचे मुख्यालय
सांताबार्बरा, कॅलिफोर्निया (अमेरिका) येथे आहे. आज यार्डी ही जगातील आघाडीच्या
प्रॉपर्टी टेक्नॉलॉजी कंपन्यांपैकी एक मानली जाते. कंपनीचे ४० हून अधिक देशांमध्ये
कार्यालयांचे जाळे असून ९,००० पेक्षा अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यार्डीची
सॉफ्टवेअर उत्पादने निवासी, व्यावसायिक, औद्योगिक तसेच विविध प्रकारच्या रिअल
इस्टेट प्रकल्पांच्या व्यवस्थापनासाठी वापरली जातात. कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता,
क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डेटा अॅनालिटिक्सचा वापर करून मालमत्ता व्यवस्थापन अधिक
कार्यक्षम, सुरक्षित आणि पारदर्शक बनविण्यासाठी नाविन्यपूर्ण उपाय विकसित करत आहे.
यार्डीची उत्पादने जगभरातील हजारो ग्राहक आणि मोठ्या रिअल इस्टेट कंपन्यांकडून
वापरली जातात. तंत्रज्ञान क्षेत्रातील नवोन्मेष, ग्राहककेंद्री सेवा आणि जागतिक
दर्जाच्या सॉफ्टवेअर सोल्युशन्समुळे यार्डीने आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी ओळख
निर्माण केली आहे. साक्षीच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. कैलाश
करांडे, उपप्राचार्य डॉ. स्वानंद कुलकर्णी, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी डॉ.
समीर कटेकर डॉ. चेतन पिसे, डॉ. भालचंद्र गोडबोले, डॉ. श्याम कुलकर्णी, डॉ. श्रीगणेश
कदम, डॉ. संपत देशमुख, डॉ. अल्ताफ मुलाणी, डॉ. बाळासाहेब गंधारे, डॉ. अतुल आराध्ये,
डॉ. सोमनाथ कोळी, डॉ. सुभाष पिंगळे, डॉ.अनिल निकम, डॉ. शिवशंकर कोंडूरु, डॉ. यशवंत
पवार, डॉ. सत्यवान जगदाळे आदीसह महाविद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर
कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
