*वारी एक कडक व्रत......*

*माऊलींचे प्रस्थान पुर्व संधेवर पाऊसाचे थैमान आळंदीत पोहचणारे चारही पुल पाण्याखाली शासनाचा सतर्कतेचा इशारा* आळंदी हुन माऊलींच्या पालखीचे प्रस्थानापासून पायी वारीला सुरुवात होते, आळंदी पुणे सासवड उत्साहाच्या भरात जातात, कशाचीही कमतरता जाणवत नाही आज शासन वारकऱ्यांची सर्व तोपर्यंत जबाबदारी घेत आहे, वारीत कशाचीही कमतरता नाही, परंतु पायी वारीचा अनुभव काही वेगळाच आहे, जीवनात कसे वागावे कसे चालावे, याबाबतचे अमूल्य शिक्षण मिळते. वारीचे व्रत अत्यंत कठीण आहे, ऊन पावसाची परवा न करता सतत रोज पंधरा ते वीस किलोमीटर पायी चालावे लागते . रात्री एक ते दोन वाजता उठून गार पाण्याने आंघोळ करून, सुरुवात काकड आरती हरिपाठ,टाळ, मृदंगाच्या हरी नामाच्या जयघोषात भूक तहान विसरली जाते, रस्त्याच्या कडेला जागा मिळेल तिथे दुपारचे जेवण करून, स्वतःचे ताट स्वतः धुवावे लागते, परत थोड्या वेळानंतर लगेचच चालावे लागते, रात्रीचा मुक्काम प्रत्येकाच्या ठरलेल्या ठराविक ठिकाणी असतो, पोहोचल्यानंतर प्रत्येकाने आपापला बिछाना राहुटीत घेऊन जावा लागतो रात्री हरिपाठ, भजन, कीर्तन, प्रवचन सतत भगवंताचे नामस्मरण होत असल्याने दुसरे कसलेही विचार मनात येत नाही, एकादशीला सर्व संतांच्या पालख्या पंढरपुरात येऊन दाखल होतात भगवंत भेटीचा एक अनोखा सोहळा डोळ्याचे पारणे फेडतो, प्रत्येकाला आस भगवंत भेटीची असते जसजसे पंढरपूर जवळ येईल तसतसे पावले आपोआपच कसलाही कंटाळा न येता भगवंत भेटीच्या दिशेने वळतात एक शिस्तबद्ध सोहळा अनुभवास मिळतो जीवनात वारीचे खूप महत्त्व आहे माऊलींनी लिहीलेल्या *हरिपाठ जीवनाचे सार आहे जीवनात कसे वागावे, कसे जगावे,* याचे अमूल्य सार दिले आहे, प्रत्येकाने हरिपाठ वाचला पाहिजे. *ज्ञानेश्वरीतील एक तरी ओवी अनुभवावी* माऊलींचे जीवनात खूप त्रास झाला तरीसुद्धा माऊलींनी जगाच्या कल्याणासाठी भगवंताकडे पसायदान मागितले आज इतर धर्मात धर्मप्रसारासाठी शालेय जीवनापासूनच सुरुवात असते परंतु आपल्या समाजात धर्माचे महत्त्व नाही अराजकता माजली आहे, याबद्दल कोणालाही सोयरसुतक नाही, मुलांना वारीचे महत्व नाही, आजही आपल्याकडे वयाच्या पन्नास पंचावन्न नंतर त्यांची मुलेच म्हणतात, आता घरात बसून काय करता वारीला जावा, परंतु आता जाऊन काय उपयोग ती वेळ निघून गेलेली असते, मग आत्ताची वारी नसून फक्त हेलपाटे होतात. कितीही वाऱ्या केल्या तरी त्याची किंमत शून्य आहे, वयाच्या वीस वर्षाच्या आतच माऊली जगाचे कल्याण कशात आहे हे ओळखून ज्ञानेश्वरी चे लेखन केले, त्यांच्याप्रमाणे जीवन जगले तर जीवनात कशाचीही कमतरता भासणार नाही *आस पांडुरंग भेटीची* *श्री रविंद्र परशुराम वेदपाठक* *ता. फलटण जि. सातारा फोन नंबर ९९७०७४९१७७* ‌ .......*राम कृष्ण हरी*...... 🙏

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form