वाशीमच्या दिव्यांग शिबीरात २७५ दिव्यांगांच मोजमाप* *दिव्यांगांना आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय मोफत देण्याबाबत*

* * वाशीम ता.१९(प्रल्हाद पौळकर) रविवारी (दि.१४) सकाळी ९ते दूपारी ३वाजेपर्यंत वाशीम शहरातील स्वागत लॉन येथे गेल इंडिया लिमिटेड यांच्या सी.एस.आर.निधीतून मोफत दिव्यांग शिबिरात रविवारी (दि.१४) सकाळी ९ते दुपारी ३ वाजेपर्यंत दिव्यांगासाठी मोफत आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात व कॅलिपर मोजमाप शिबिरात २७५ दिव्यांगाचे मोजमाप आयोजित करण्यात आले.यावेळी आधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाया विषयी माहिती पुणे येथील भारत विकास परिषदेचे दिव्यांग व पुनर्वसन केंद्राचे विश्वस्त व दिव्यांग केंद्रप्रमुख विनय खटावकर यांनी दिली यावेळी आमदार श्याम खोडे यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले, यावेळी गेल इंडिया लि.चे संचालक अमरावती येथील प्रो.डॉ. रविकांत कोल्हे, चिंतामणेश्वर मठ व वीरशैव लिंगायत समाजाचे जेष्ठ पदाधिकारी काशिनाथ लाव्हरे, अनिल केंदळे नगराध्यक्ष वाशिम,गिरधारीलाल सारडा, डॉ राजशेखर अभ्यंकर, डॉ हेमंत गोखले आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी दिव्यांग मोजमाप शिबिराला संबोधित करताना विनय खटावकर यांनी सांगितले की भारत विकास परिषद ही सेवा व संस्कार क्षेत्रात निस्वार्थपणे काम करणारी राष्ट्रीय संघटना आहे दिव्यांगांना कृत्रिम अवयव बसविणे हा प्रमुख राष्ट्रीय सेवा प्रकल्प आहे यामध्ये देशातील १३दिव्यांग केंद्रापैकी महाराष्ट्रातील कायमस्वरूपी पुणे येथील दिव्यांग केंद्र आहे या दिव्यांग केंद्राच्या माध्यमातून महाराष्ट्र स्तरावर दरवर्षी सुमारे ५ हजार दिव्यांगांना मोफत कृत्रिम पाय हात व कॅलिपर बसविण्यात येतात यामध्ये यावर्षी श्री चिंतामणेश्वर मठ संस्थान व वीरशैव लिंगायत समाज वाशीम जिल्हा व वाशिम चे आमदार श्याम खोडे यांच्या सहयोगाने आज होणाऱ्या पात्र लाभार्थींना ह्या योजनेचा लाभ होईल असा विश्वास त्यांनी दर्शवीला. दिव्यांगांसाठी मोफत आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय आणि हात कॅलिपर मोजमाप शिबिराच्या माध्यमातून पात्र लाभार्थींना ह्यांचा लाभ मिळावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.विशेष म्हणजे आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय याची बाहेर कमर्शियल किंमत रुपये पन्नास हजारापेक्षा जास्त आहे असा पाय संबंधित दिव्यांगांना मोफत दिल्या जाणार आहे. अशी माहिती आमदार शाम खोडे यांनी दिली आधुनिक मॉड्युलर कृत्रिम पाय ऑटो फोल्ड असून वजनाने हलके आहेत आधुनिक कृत्रिम मॉड्युलर पाय बसल्यानंतर दिव्यांग व्यक्ती चालणे पळणे पोहणे उडी मारणे वाहन चालविणे व शेती कामे इत्यादी प्रकारच्या दैनंदिन क्रिया करू शकतात अशी माहिती यावेळी रविकांत कोल्हे यांनीदिली . वाशीमचे नगराध्यक्ष अनिल केंदळे ह्यांनी वाशीम साठी किमान ३५० लाभार्थ्यांना या योजनेत समाविष्ट करण्याचा सदरहू मंडळीचा संकल्प आहे तेव्हा याचा जास्तीत जास्त फायदा दिव्यांग बांधवानी घ्यावा असे आवाहन केले.यावेळी जेष्ठ मार्गदर्शक दादासाहेब उर्फ काशिनाथ लाव्हरे आणि डॉ.हरीश बाहेती,वाशिम नगर परिषद भाजपा गटनेते बाळूभाऊ मुरकुटे, भाजपा वाशीम तालुकाध्यक्ष एकनाथराव कड, बाजार समिती संचालक नथ्थूजी कापसे,सुरेश लोखंडे आणि बाळासाहेब हवा यांनी समायोजित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाची संचालन मोहन बोरगावकर यांनी केले तर आभार प्रदर्शन राजकुमार बोनकिले यांनी केले. चौकट दिनांक 28 जुलैला वाटपच्या दिवशी वाशिम जिल्ह्यातील किंवा इतर नवीन राहिलेल्या दिव्यांगाना पुन्हा एकदा नोंदणीची संधी मिळणार नोंदणीसाठी मोबाईल नंबर 9657345543 डॉ हेमंत 9823102862 डॉ अभ्यंकर

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form