*नागपूर विधान परिषदेत भाजपचा झेंडा! डॉ. राजीव पोतदार यांचा दणदणीत विजय*.

*सोलापूर / पंढरपूर :* नागपूर विधान परिषद मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार _डॉ. राजीव पोतदार_ यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयाने नागपूरच्या राजकारणात नवी चर्चा सुरू झाली आहे. *शिक्षण आणि सेवेचा विजय* डॉ. राजीव पोतदार हे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर असून, शिक्षण, विद्यार्थी आणि सामाजिक प्रश्नांवर त्यांची गेली अनेक वर्षे कामगिरी आहे. पदवीधर मतदारांनी त्यांच्या अनुभवावर, प्रामाणिकपणावर आणि जनसेवेच्या वचनावर विश्वास दाखवला. *नागपूरच्या विकासाला गती मिळणार* डॉ. पोतदार यांच्या निवडीमुळे नागपूरच्या शिक्षण क्षेत्रातील प्रश्न, पदवीधर बेरोजगारी, रोजगार निर्मिती आणि विकासकामांना विधानभवनात बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. ते आता नागपूरकरांचा आवाज म्हणून विधीमंडळात काम पाहणार आहेत. *सोनार समाजाकडून अभिनंदन* डॉ. पोतदार यांच्या विजयाबद्दल सोलापूरच्या सोनार समाज संस्थेने हार्दिक अभिनंदन केले आहे. समाजाच्या वतीने शुभेच्छा देताना अध्यक्ष श्री. वसंत पोतदार यांचे कडून सांगण्यात आले की, "डॉ. पोतदार यांच्या रूपाने विधीमंडळात समाजाचा आवाज मजबूत झाला आहे. त्यांच्या नेतृत्वावर आम्हाला पूर्ण विश्वास आहे." *मराठी बाणा न्यूज* संपादक - विनोद पोतदार, पंढरपूर डॉ. राजीव पोतदार यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देत आहे. *जय श्रीराम!* विनोद पोतदार, पंढरपूर

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form