*संस्कृतीचा मान आणि नात्यांचा सन्मान.!* " नात आपुलकीच, कौतुक सोहळ्याचा ".

*पोतदार सरांच्या सुसंस्कृत परिवाराचा.*
सोलापूर येथील आमचे आदरणीय श्री. चिदानंद पोतदार सर व सौ कविता पोतदार यांनी अधिक मासाचे ( धोंड्याच्या महिन्याचे ) औचित्य साधून जावई श्री.स्वप्नील जमखंडीकर व सुकन्या सौ. किरण यांचा जो राजेशाही थाटात सन्मान केला तो अत्यंत कौतुकास्पद आणि आमच्यासाठी अभिमानास्पद आहे. *संपूर्ण पोतदार परिवाराचे आदरांतिथ्य* -- चिदानंद पोतदार सर आणि त्यांच्या परिवाराने केवळ परंपरा पाळली नाही, तर नात्यामध्ये प्रेमाचा सुवास, सुगंध भरला. या सोहळ्यात चिदानंद सरांच्या मातोश्री श्रीमती भीमाबाई पोतदार, बंधू श्री. शिवानंद, चिरंजीव चिन्मय ( संस्कार ), तसेच मामा श्री. सिद्धाराम व श्री सुरेशराव, मेहुणे श्री. किशोरकुमार व श्री. संदीप पोतदार या सर्वच सदश्यानी मिळून पाहुण्यांचे केलेले आदरांतिथ्य मनाला भावणारे होते. *जावई लेकीचा गौरव.* -- श्री. स्वप्नील व सौ.किरण यांना फुल्ल आहेर, अर्धा किलो वजनाचा चांदीचा तांब्या, आणि अर्धा तोळा सोन्याची अंगठी भेट देऊन त्यांचा विशेष मान राखला. *व्याही मंडळाचा सन्मान :* श्री. स्वप्नील चे आई वडील, भाऊ भावजय, आणि आम्हां आत्या काका सह सर्व नातेवाईकांना अत्यंत आदराने वस्त्र भेट ( आहेर ) देऊन सन्मानीत केले. *शाही स्वागत :* घराच्या प्रवेश द्वारावर सर्व पाहुण्यांचे पाय धुवून, गंध लावून आणि गुलाब पुष्प देऊन केलेले स्वागत मनाला स्पर्शून गेले . *स्नेह भोजन.*-- 50 नातेवाईकांना एकत्र आणून दिलेले प्रीती भोजन अतिशय तृप्त करणारे होते. आजच्या काळात संपूर्ण सासरच्या परिवाराला एकत्रित बोलावून असा आदर सत्कार करणे हे पोतदार सरांच्या आणि त्यांचा संपूर्ण सुसंस्कृत परिवाराच्या मोठया मनाची साक्ष देते. त्यांनी केलेल्या या आदरांतिथ्याने आमचा ऊर अभिमानाने भरून आला आहे. *पोतदार परिवाराचे आम्हां सर्वांतर्फे मनःपूर्वक आभार, अभिनंदन आणि हार्दिक गौरव.* *शुभेच्छुक,* *वसंत पोतदार.* *सौ. चित्रा पोतदार.* *सोलापूर.*

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form