उस्माननगर-(ता.५) समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालया चे कलाध्यापक तथा
पर्यवेक्षक राजीव अंबेकर यांची जागतिक पर्यावरण दिनी निसर्ग व सामाजिक पर्यावरण
प्रदुषण निवारण मंडळ महाराष्ट्र राज्य च्या राज्य सल्लागार पदि राजीव अंबेकर यांची
नियुक्ती करण्यात आली आहे.गत तीस वर्षा पासुन पर्यावरण विषयक कार्य ते करत असुन
गेली बावीस वर्षा पासन मंडळा चे संस्थापक अध्यक्ष स्व.वृक्षमित्र आबासाहेब मोर
यांच्या सोबत ते कार्यात सहभगी आहेत.आनेक पद भुषवत त्या पदाला न्याय देण्याचा
प्रामाणिक प्रयत्न अंबेकर करत आहेत.वृक्षारोपण,वृक्ष संवर्धन, पर्यावरण जनजागृती ,
सामाजिक प्रबोधन,कला,शिक्षण इ.क्षेत्रातील कार्याची दखल घेवून राज्य अध्यक्ष प्रमोद
मोरे व कार्यकारणी ने अंबेकर यांची हि नियुक्ती करण्यात आली आहे. अंबेकर हे
पर्यावरण जनजागृती साठी सातत्याने विविध उपक्रम राबवित असतात . पर्यावरण संवर्धन
काळाची गरज आसुन हि लोक चळवळ होण्यासाठी ते प्रयत्नशील रहाणार असल्याचा निर्धार
त्यांनी व्यक्त केला .शिक्षण व पर्यावरण ह्या परस्परपूरक क्षेत्रात जनजागृती वर
विशेष भर देणार आहेत.२०२६ ते २०२९ या कालावधीत विविध उपक्रमे, कार्यशाळा,जनजागृती
मोहीमा,वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात येणार आहेत.राजीव अंबेकर यांच्या नियुक्ती बद्दल
उस्माननगर विभाग मराठी पत्रकार संघ उस्माननगर , समता शिक्षण प्रसारक मंडळ मोठी लाठ
चे सर्व पदाधिकारी समता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय उस्मान नगर मुख्याध्यापक
व शिक्षक , शैक्षणिक ,सामाजिक, राजकीय ,कला , धार्मिक , संघटना च्या पदाधिकारी
यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
