खा.संजय राऊत साहेब, अजितदादांच्या राष्ट्रवादीवर टीका करण्यापेक्षा आधी उबाठाची
अवस्था बघा
पंढरपूर प्रतिनिधी -- उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत
यांनी नुकतीच अजितदादांच्या राष्ट्रवादीवर टीका केली त्या टीकेला राष्ट्रवादी युवक
कॉंग्रसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. श्रीकांत
शिंदे म्हणाले की, संजय राऊत साहेब यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादी पक्षावर टीका
करण्यापेक्षा आधी स्वतःच्या उबाठा पक्षाची अवस्था पाहावी. कारण आज परिस्थिती अशी
आहे की, उबाठा पक्षात बोटावर मोजण्याइतके आमदार उरले आहेत आणि खासदार आहेत ते कधी
ऑपरेशन टायगरच्या माध्यमातून बाहेर पडतील हे देखील कळणार नाही. राऊत साहेब तुमच्या
अशा सततच्या बोलण्यामुळेच अनेक महत्वाचे नेते मंडळी तुमच्यावर व तुमच्या उबाठा
पक्षावर नाराज होत आहेत. तुमच्या पक्षाच्या हातातून अनेक वर्षांपासून ताब्यात
असलेली मुंबई महानगरपालिका सुद्धा गेली. रोज सकाळी उठायचे नाही भोंगा वाजतो तशी
तुम्ही पत्रकार परिषद घेऊन फक्त आरोप आणि टीका करण्याचे काम करत आहेत. त्याला
जनतेच्या मनात कोणतेही स्थान नाही. केवळ वायफळ बडबड करण्यापेक्षा आहे ते
लोकप्रतिनिधी कसे तुमच्या सोबत राहतील याचा विचार आपण केलेला बरा अन्यथा आहे
त्यापेक्षा वाईट अवस्था तुमच्या पक्षाची होईल ती केवळ तुमच्या बोलण्यामुळेच.
महाराष्ट्रातील जनता आता हे सर्व ओळखून आहे. केवळ बोलून पक्ष वाढत नसतो, त्यासाठी
जनतेमध्ये जाऊन काम करावे लागते. स्वतःच्या पक्षातील नाराजी, गळती आणि अंतर्गत
संघर्ष थांबवता येत नाही आणि दुसऱ्यांच्या पक्षावर टीका केली जाते, हे हास्यास्पद
काम सध्या तुमच्याकडून सुरू आहे. राहिला विषय राष्ट्रवादीचा आगामी काळात
उपमुख्यमंत्री सुनेत्रावहिनींच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणखी मोठी
झेप घेईल. आमचे दैवत आदरणीय अजितदादांच्या अचानक जाण्याने आमच्यावर दु:खाचा डोंगर
कोसळला मात्र आदरणीय सुनेत्रावहिनी यांनी पक्षाची सुत्रे हाती घेवून उपमुख्यमंत्री
पदाची शपथ घेतली व ज्याप्रमाणे अजितदादा काम करीत होते त्यांच्याच पाऊलावर पाऊल
टाकून त्या काम करीत आहेत त्यामुळे आगामी काळात अजितदादांच्या राष्ट्रवादीची ताकद
काय आहे, हे तुम्हाला समजेल. संजय राऊत साहेब, 2019 ला किती आमदार व खासदार होते
तुमच्या पक्षाचे व आता 2024 नंतर किती उरले आहेत याचा अभ्यास करण्याची गरज
तुमच्यासारख्यांवर आलेली आहे. मात्र केवळ उठसुट पत्रकार परिषद घेवून आरोप
प्रत्यारोप करायचे आहे आणि मी किती विद्वान आहे हे दाखविण्याची तुमची पध्दत सध्या
तुमच्या पक्षाच्या अधोगतीला कारणीभूत ठरत आहे. आपण असेच जर बोलत राहिला तर येणाऱ्या
काळात आहे ते आमदार किंवा खासदार देखील तुमच्या पक्षातून बाहेर पडतील त्यानंतर
तुम्हाला तुमचे खरे वास्तव समजेल तुतार्स एवढेच सांगतो असे म्हणत राष्ट्रवादी युवक
कॉंग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे यांनी खासदार संजय राऊत यांना सुनावले आहे.
