पंढरपूर नगरपरिषदे मार्फत स्विपर रोड मशिन कार्यान्वित

पंढरपूर प्रतिनिधी -- “स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर” करण्यासाठी पंढरपूर नगरपरिषदेची असलेली स्विपर रोड मशीन दुरुस्त करून पुन्हा कार्यान्वित करण्यात आली असून यावेळी लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉ.सौ.प्रणिताताई भगिरथ भालके यांच्या हस्ते पूजा करण्यात आली. पंढरपूर शहरातील व बाहेरून येणारे नागरीक गेली अनेक वर्षे रस्त्यांवरील धुळीमुळे हैराण झाले होते,धूळ साफ करणारी मशीन तब्बल पाच ते सात वर्षे बंद अवस्थेत धूळ खात पडली होती,मागील सत्ताधाऱ्यांनी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले होते. शहर अधिक स्वच्छ धुळमुक्त ठेवण्याचा संकल्प ठेवून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून,आधुनिक यंत्रणेमुळे शहरातील रस्ते स्वच्छ ठेवण्यास या मशीनने मोठी मदत होणार आहे. रस्त्यांवरील धूळ,कचरा आणि घाण साफ करण्यासाठी आधुनिक स्विपर मशीन प्रभावीपणे कार्य करणार असून शहराच्या स्वच्छता मोहिमेला अधिक गती मिळणार आहे. “स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीत उतरवत स्वच्छतेवर विशेष भर देण्यात येत आहे असे नगराध्यक्षा डॉ प्रणिता भालके यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी उपस्थित नगरसेवक सुधीर धोत्रे,संजय बंदपट्टे,आदित्य फत्तेपूरकर,किरण घाडगे,प्रसाद भैया कळसे,अक्षय गंगेकर,लोकेश यादव,विनायक देवमारे,सुधीर भोसले,भीमाराव आप्पा माळी,मुहम्मद उस्ताद,मनमोहन अभंगराव,बापू चौधरी,बंडू डोईफोडे विशाल आर्वे तसेच नगरपरिषदेचे स्वच्छता व आरोग्य विभागाचे अधिकारी,कर्मचारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form