"निर्भया पथक पंढरपूर विभाग यांना पंढरपूर शहर हद्दीत होणारा बालविवाह तत्काळ रोखण्यात यश.

" " *एका आठवडयात दुसरा तर दोन महिन्यात सलग चौथा बालविवाह पथकाने रोखला*"
पंढरपूर प्रतिनिधी दिनांक १३/०५/२०२६ रोजी पंढरपूर विभागाच्या निर्भया पथकाच्या मोबाइल कं. ९११२२२६३५२ वर मिळालेल्या माहिती नुसार पंढरपूर शहर हद्दीत एका मोठ्या नामांकित हॉलमध्ये एक बालविवाह होत असल्याचे बातमी मिळाल्याने निर्भया पथक पंढरपूर यांनी सदर ठिकाणी तात्काळ जावुन चौकशी केली असता तिथे मुलगी व तिचे नातेवाइक मिळून आले. नातेवाईक यांनी विवाह होत असलेबाबत नकार दिला, मात्र निर्भया पथकाने चौकशी करुन त्यांनी छापलेल्या पत्रिका नातेवाइकांना दाखवली व सोक्षमोक्ष लावत विवाह तत्काळ थांबिवला. ती शिकत असलेल्या शाळेतुन तिचे बोनाफाईड प्रमाणपत्र घेवून आले असता तिचे वय हे १७ वर्षे १ महीने दिसुन आले. व त्यानंतर तो होणारा विवाह तिचे आई वडीलांना समज देवुन तत्काळ रोखण्यात आलेला आहे. व त्या अल्पवयीन मुलीस बालकल्याण समिती, सोलापूर यांचेसमक्ष पुढील कार्यवाहीकरीता हजर करण्यात आले. तसेच निर्भया पथक, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांनी पंढरपूर शहर, पंढरपूर तालुका, पंढरपूर ग्रामीण तसेच करकंब पोलीस ठाणे हद्दीतील सर्व जनतेला आवाहन केले आहे की, आपले हद्दीमध्ये, आपल्या नातेवाईकांमध्ये अशा प्रकारचे बालविवाह होत असल्यास आम्हास, निर्भया पथकास संपर्क करावा (९११२२२६३५२) व यापुढे कोणी अशा प्रकारचे बेकायदेशीर कृत्य करेल अशा लोकांवर प्रचलित कायद्यानुसार अत्यंत कडक कारवाई केली जाईल. तसेच अशा लोकांची गय केली जाणार नाही असे सांगितले आहे. सदरची कारवाई मा. अतुल कुलकर्णी, पोलीस अधिक्षक सोलापूर ग्रामीण, मा. प्रितम यावलकर, अप्पर पोलीस अधिक्षक, सोलापूर ग्रामीण, मा. प्रशांत डगळे, सहा. पोलीस अधिक्षक (भा.पो.से) पंढरपूर विभाग, पोलीस निरिक्षक दशरथ वाघमोडे पंढरपूर शहर यांचे मार्गदर्शनाखाली निर्भया पथक प्रमुख म. पोलीस उपनिरीक्षक / सुप्रिया यादव/रावण, पोकॉ/१२३६ शशिकांत सावंत, पोकॉ/१३९५ लक्ष्मण कुचेकर म. पोकॉ/१३११ निर्मला वाघमारे, म. पोकॉ/२०४८ काझी, पोना / ७१८ भगत, पोकॉ/२११५ चव्हाण

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form