-पंढरीत श्री परशुराम जन्मोत्सव उत्साहात साजरा

 



पंढरपूर (प्रतिनिधी,)- येथील मध्यवर्ती ब्राह्मण संघ व श्री परशुराम सर्पमित्र मंडळ यांचे वतीने श्री परशुराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात व शोभायात्रेने साजरा करण्यात आला. 

दिनांक 19 रोजी जन्मोत्सव निमित्ताने श्री व सौ नितीन कुलकर्णी सर या उभयतांच्या हस्ते श्री स अभिषेक व पुजा करण्यात आली व दिनांक 20 रोजी पंढरपूर मंगळवेढा मतदार संघाचे आमदार समाधान आवताडे व माजी आमदार, मार्गदर्शक प्रशांत परिचारक यांचे हस्ते पुजन करण्यात आले. या प्रसंगी आमदार समाधान आवताडे 

 बोलताना म्हणाले की जन्मोत्सव च्या माध्यमातून मंडळाने समाज प्रबोधन कार्यक्रम हाती घेवून समाजाबरोबरच शहर विकासाचा पाया ब्राह्मण समाज ठरेल असे कार्य भविष्यात हाती घ्यावेत. 

त्याचा समाजाला चांगलाच फायदा होईल.या वेळी प्रशांत परिचारक यांनी मार्गदर्शक पर विचार मांडले.या वेळी युवा नेते प्रणव परिचारक,नगरसेवक

ओंकार जोशी नगरसेवक, 

भागवतमहाजन नगरसेवक, सौरभ थिटे नगरसेविका सौ मनिषा धनंजय देशपांडे डॉ सुरेंद्र काणे श्रीकांत महाराज हरिदास व ब्रम्हानंद मंडळी व समाज बांधव भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

                   त्या नंतर पंढरपूर शहरातून श्री भगवान परशुराम यांच्या मुर्तीची शोभायात्रा मोठ्या उत्साहात काढण्यात आली. यावेळी मार्गावर विविध समाज बांधव व भगिनींनी आपापल्या दुकानांसमोर व घरा पुढे सडा रांगोळी ने स्वागत व सर्व समाज बांधवांना पाणी, सरबताचे वाटप करण्यात आले. 

सदर शोभायात्रे मध्ये शहरासह उपनगरामधील समाज बांधव भगिनी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यात साठी ओंकार वाटाणे, वैभव कुंभारे , गणेश कुलकर्णी, मंदार जोशी , आनंद तेंडुलकर , उमेश टोमके ,गणेश लंके , श्रीराम बडवे , अमित शिरगावकर , महेश आराध्ये,श्री राम बेणारे , महेश काळे आणि ब्राह्मण समाज यांनी विशेष परिश्रम घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form