भालके,सावंत यांचा अनाथाचा नाथ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार

पंढरपूर टिळक स्मारक येथे रविवारी १२ एप्रिल रोजी पक्ष प्रवेश निश्चित...
पंढरपूर प्रतिनिधी -- भगिरथ भालके,अनिल सावंत यांनी शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे पत्रकार परिषदे घेत तिर्थक्षेत्र विकास आघाडीचे पंढरपूर व मंगळवेढा तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजयी उमेदवार तसेच भालके,सावंत प्रेमीसह बहुसंख्य कार्यकर्ते मोठ्या संख्येने शिवसेना शिंदे गटात प्रवेश निश्चित केला असून रविवारी १२ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता टिळक स्मारक, पंढरपूर येथे हा पक्ष प्रवेशाचा सोहळा पार पडणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत प्रमुख पदाधिकारी व भगिरथ भालके, अनिल सावंत यांनी दिली. 'पंढरपूर शहराच्या सर्वांगीण विकासकामांना गती देण्यासाठी आणि जास्तीत जास्त निधी खेचून आणण्यासाठी आम्ही सर्वांनी शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. मी स्वतःसाठी कोणतेही पद मागितले नाही. नगरपालिका निवडणुकीत शहरातील जनतेने विकासासाठी नगराध्यक्ष म्हणून प्रणिता भालके यांना निवडून दिले आहे. परंतु विरोधक विकासकामांत अडचणी निर्माण करत आहेत, सत्ताधारी गटाचे राजकारणी नव्याने आलेल्या योजनांना आडकाठी करत आहेत, तसेच यापुढे दडपशाही सहन करणार नाही. राजकीय वर्तुळातून उलट सुलट चर्चा सुरू आहे. या अफवांवर जनतेने विश्वास ठेवू नये तिर्थक्षेत्र विकास आघाडी मजबूत आहे. आमच्या मध्ये कोणत्याही प्रकारचा मतभेद नाही. सामाजिक कार्यात, राजकारणात काही चुकीचे घटना, व्यक्तव्य घडतात, त्याबाबत विचार करून सामंजस्याने तोडगा काढला आहे. सर्वसामान्याचा विकासासाठी लोकांच्या सेवेसाठी समर्पित राहून काम करण्याची आमची विचारधारा आहे. म्हणूनच आम्ही अनाथाचा नाथ राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.' असे पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना भगीरथ भालके यांनी सांगितले. या पत्रकार परिषदेच्या वेळी भगीरथ भालके व त्यांचे समर्थक तसेच नुकतेच राष्ट्रवादीतून परतलेले अनिल सावंत व त्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form