*आनंदी बहुउद्देशीय सामाजिक संस्था, उपळाई बुद्रुक संचलित पॉसिबल एज्यूकेशन अँड
ट्रेनिंग सेंटर तर्फे NMMS Dec 2025 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा
सत्कार कार्यक्रम साजरा...*
माढा प्रतिनिधी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. वैभव गोरे
साहेब (माढा तालुका उपाध्यक्ष, राष्ट्रवादी (शरद पवार गट), प्रमुख पाहुणे प्रा.
नितीन झाडबुके सर नूतन माढा तालुका पंचायत समिती सदस्य (प्रवक्ता भाजप) यांचे हस्ते
प्रतिमापूजन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. सचिव. डॉ. अतुल ज्ञानेश्वर क्षीरसागर
सर व सदस्य श्री. सागर गाडेकर यांनी प्रमुख पाहुणे व अध्यक्षांचा यांचा सत्कार
केला. प्रास्ताविकमध्ये डॉ. अतुल सरांनी 100% विद्यार्थी पास झाल्याचे सांगितले व
अशा कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना कायम प्रेरणा देत राहू व नवनवीन उपक्रम राबवून
अशे प्रतिपादन केले. NMMS Dec 2025 मध्ये उत्तीर्ण कु. अनुष्का उडगे, समर्थ माळी,
समर्थ शिंदे, कु. प्रतीक्षा भांगे, पार्थ काटे, सर्वार्थ फुगे, अभिषेक गोरे, कु.
श्रावणी दसंगे, शिवम बेडगे, आर्यन शिंदे, तनिष्का कोरके या सर्व विद्यार्थ्यांचा
प्रमाणपत्र व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर सदस्य सागर गाडेकर यांनी
आपले मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात श्री. वैभव गोरेनी या वर्षी सरांनी सर्व
दगडाच्या मुरत्या घडवल्या असे प्रतिपादन केले. तर प्रमुख पाहुण्यांच्या भाषणात
प्रा. नितीन सरांनी "भविष्यात यश आले म्हणून हुरळून जाऊ नका व अपयश आला तर खचू नका
हा मोलाचा सल्ला दिला". त्यांनी शिक्षणाचे मोल, अभ्यास पद्धती सांगितली थोडीशी
हितगुज केली. आणि विद्यार्थांशी दिलखुलास गप्पा मारल्या. कु. अनुष्का उडगे हिने
आपले मनोगत व्यक्त केले. व माजी विद्यार्थी तनिष नागटिळक यांने फोटोसेशन केले. आणि
अध्यक्षाच्या परवानगीने श्रेयस गोरे याच्या हम होंगे कामयाब या गितगायनानंतर ग्रुप
फोटो घेऊन, सर्वांचे आभार मानत नाश्त्याने कार्यक्रमांची सांगता झाली. कार्यक्रमाचे
सूत्रसंचालन कु. स्वराली शिंदे व कु. शिवमुद्रा नागटिळक यांनी मिळून केले.
त्यांचेही कौतुक करण्यात आले.
