पंढरपूर डाक विभागात पी एल आय व आर पी एल आय विभागात पुनम सोनार सर्वप्रथम

[] [] अकलूज (वार्ताहर ) [] माळशिरस पोस्ट विभागातील पोस्टल असिस्टंट पुनम मंगेश सोनार यांनी आर पी एल आय व पी एल आय विभागात पंढरपूर डिव्हिजन मधून सर्वांत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पंढरपूर डाक विभागाचे डाकघर अधीक्षक मुन्ना कुमार, सहा. डाकघर अधीक्षक राजेश शर्मा,एम. एम.पाटील पोस्टमास्टर सोमनाथ गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थित पुनम सोनार यांचा सर्वत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डाकघर अधीक्षक मुन्ना कुमार म्हणाले, पोस्टच्या विविध योजना जनतेपर्यंत पोहचवा टपाल ग्रामीण जीवन बिमा योजनेचे महत्व लोकपर्यंत पोहचवून पोस्टाचा बिझनेस वाढवावा पोस्टाचे ग्राहक व पोस्टल कर्मचारी यांच्या अडचणी सोडवण्यास प्राध्यान्य देणार असून जास्तीत जास्त काम करावे असे त्यांनी शेवटी आव्हान केले. यावेळी पंढरपूर डिव्हिजन मधील उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही गौरवण्यात आले. यावेळी पंढरपूर विभागातील कर्मचारी उपस्थित होते [] फोटो :

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form