संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून) शंकरनगर-अकलूज येथील महर्षी प्रशाला व्यवसाईक
अभ्यासक्रम विभागाच्या वतीने गुटखा,सिगारेट यांची पाकिटे जाळून विद्यार्थी व
शिक्षकांनी अनोख्या पद्धतीने व्यसनांची होळी सण साजरा केला. यावेळी बोलताना योग
शिक्षक प्रा.धनंजय देशमुख म्हणाले,गुटख्याची एक पुडी एक रुपयाला जरी पकडली तरी
महाराष्ट्रात दररोज सुमारे 720 कोटी रुपये निव्वळ थुंकण्यावर वाया जात
आहेत.दारू,ड्रग्ज ही मोठी खर्चिक व्यसने झाली आहेत. स्वस्तात नशा करण्यासाठी फक्त
गुटखाच नव्हे तर अनेक लोक खोकल्याचे औषध,टायर पंक्चरचे सोल्युशन,बूट पॉलिशचे
केमिकल, व्हाईटनर अशा वेगवेगळ्या व्हरायटीचे व्यसन करत आहेत. यामुळे आर्थिक संपत्ती
बरोबरच शारीरिक संपत्तीचेही नुकसान होते. महर्षी प्रशालेचे मुख्याध्यापक संजय
गळीतकर म्हणाले,देश सदृढ हवा असेल तर देशातील लोक सदृढ असणे गरजेचे असते.व्यसनाने
पोखरलेले लोक देशाची प्रगती करू शकत नाहीत. यावेळी जितेंद्र माने देशमुख,दिपक
भोंग,बिभीषण जाधव,राजेंद्र कांबळे,अनिल होमकुंबरे,शिवराज काळे,हनुमंत काळे व
विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना भविष्यात
व्यसनाच्या आहारी न जाण्याची शपथ देण्यात आली.
