कोर्टी प्रतिनिधी - (अमोल गुरव) पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथे रमजान ईद निमित्त
कोर्ट येथील सर्व मुस्लिम बांधवांना 200 लिटर दूध वाटप करण्यात आले. मुस्लिम
समाजाचा पवित्र सण रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर मुस्लिम बांधवांसाठी मोफत दूध वाटप
उपक्रमाचे आयोजन करत समाजातील बंधुभाव, एकात्मता आणि सेवाभाव जपण्याचा हा प्रयत्न
आहे.कोर्टी मुस्लिम समाजाचा पवित्र सण म्हणून रमजान ईद निमित्त कोर्टी येथील सरपंच
रघु पवार, उपसरपंच मुन्ना शेख सामाजिक कार्यकर्ते अनिल कारंडे, अजमेर शेख, राजू भाई
मुलानी यांच्यामार्फत मुस्लिम बांधवांना दूध वाटप करण्यात आले.कोर्टी येथे सामाजिक
बांधिलकी जपत सरपंच रघु पवार व अनिल कारंडे अजमेर शेख उपसरपंच मुन्ना शेख यांनी
स्वखर्चाने मुस्लिम बांधवांना रमजान ईद निमित्त दूध वाटप केले.
