विश्वकर्मीय समाज वधू-वर माहिती पुस्तिकेचे प्रकाशन समारंभ संपन्न*

लातूर प्रतिनिधी- *विश्वकर्मीय समाज वधू-वर मेळावा २०२६ या उपक्रमातून साकारण्यात आलेल्या विश्वकर्मीय समाज वधू-वर माहिती पुस्तिकेचा प्रकाशन समारंभ माननीय *डॉ.अर्चनाताई पाटील चाकूरकर मॅडम प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता पार्टी*, यांच्या हस्ते विधिवत पार पडला.. समारंभात मार्गदर्शन करताना डॉ. अर्चनाताई पाटील चाकूरकर मॅडम यांनी विश्वकर्मीय समाज वधू-वर मेळाव्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल आयोजक मंडळाचे अभिनंदन केले. समाजातील विवाहयोग्य युवक-युवतींना योग्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने माहिती पुस्तिका हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यात राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व संघटनात्मक कार्यक्रमांना आपला संपूर्ण पाठिंबा व सहकार्य राहील, अशी त्यांनी स्पष्ट ग्वाही दिली. यावेळी संघटनेच्या वतीने डॉ. अर्चना पाटील मॅडमयांची भारतीय जनता पार्टी (भाजप) च्या प्रदेश उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीबद्दल औपचारिक अभिनंदन करण्यात आले… त्यांच्या भावी राजकीय व सामाजिक कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात आल्या. या प्रसंगी अध्यक्ष श्री.अनंत पांचाळ कार्याध्यक्ष श्री.सौरभ सुतार, राज्य संपर्क प्रमुख श्री.सुदर्शन बोराडे, जिल्हा संपर्क प्रमुख श्री.बळवंत पांचाळ सर, अॅड.महेश येरोळकर सर, श्री.मोहन पोद्दार, बालाजी पांचाळ सर व समाजातील मान्यवर, पदाधिकारी व सदस्यांची उपस्थिती लाभली… या उपक्रमामुळे विश्वकर्मीय समाजातील वैवाहिक समन्वय प्रक्रियेस चालना मिळून समाजातील ऐक्य अधिक बळकट होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form