पंढरपूर प्रतिनिधी-- श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांचा प्रचार व प्रसार
करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय नरहरी
सेनेचे संस्थापक अध्यक्ष धर्मभुषण काकासाहेब बुराडे यांनी केले.... सर्व शाखीय
सोनार समाजाच्या विचार मंथन बैठकीत ते बोलत होते... या बैठकीच्या अध्यक्षस्थानी
सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेशजी बुर्हाडे हे होते श्री संत
शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांना उपेक्षित ठेवण्यात सर्व शाखीय सोनार समाजाच
जबाबदार असल्याचे सांगून संतांच्या मांदियाळी त अग्रभागी आसूनही पाहिजेत ऐवढी
प्रसिद्धी आपण महाराजांना देवू शकलो नाही त्या साठी सर्व शाखीय सोनार समाजान
एकत्रीत येण्याच अवाहन बुराडे यांनी केले या वेळी बोलताना उमेशजी बुर्हाडे.म्हणाले
श्री संत शिरोमणी नरहरी महाराज सोनार यांचा हरिऐक्य सायुज्य समाधी सोहळा हा सर्वानी
मीळून साजरा केला तर त्याला वेगळे स्वरूप येईल महाराजांना एका जातीत शाखा शाखात
जखडून आपणच आपल्या महाराजां वर अन्याय करतोय. संत नरहरी महाराज सोनार हे एकमेव संत
पांडुरंगाच्या कटीत विलीन झाले आशा थोर संतांची स्मृती कायम जगाला राहाण्यासाठी आपण
आपापल्या परीने प्रयत्न करणे गरजेचे आहे या वेळी अनंतजी तरकसबंद मा सोनार समाज
अध्यक्ष तसेच सोनार समाज संस्थेचे अध्यक्ष अरुणशेठ मंजरतकर. सोनार समाज अध्यक्ष
जगदीश जोजारे भारतीय नरहरी सेनेचे प्रदेश महानिरीक्षक तथा सोनार समाज उपाध्यक्ष
लंकेश दादा बुराडे. आनंदजी कासेगावकर आदींनीही आपले मनोगत व्यक्त केले या वेळी
राजेश जोजारे. सचिन बानकर. गणेश मैड.सोनार समाज संस्था उपाध्यक्ष संजय ढाळे. सुमित
पारखे. सारंग महामुनी. मुकुंद भुमकर. सोमनाथ अष्टेकर. रामचंद्र अष्टेकर. दिलीप
सिदवाडकर. नितीन बोकन. पांडुरंग महामुनी. विशाल कोनेरीकर. सतीश पारखे. बाळासाहेब
वेदपाठक प्रवीण महामुनी. केशव महामुनी. प्रसाद ढाळे. राजेंद्र कासेगावकर. संजय
उपळकर. गणेश पंडित. बालाजी दीक्षित. उमेश बागडे. अनंत अष्टेकर. आदींसह सर्व शाखीय
सोनार समाज मोठ्या प्रमाणात सहभागी होते.....
