संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून) श्रीपूर (ता.माळशिरस)येथील आबासाहेब देशमुख
चॅरिटेबल ट्रस्ट शैक्षणिक संकुलातील श्री चंद्रशेखर विद्यालय प्राथमिक विभागाचे
उपमुख्यध्यापक शंकरराव यादव यांना ज्ञानक्रांती सामाजिक बहुउद्देशीय संस्था
महाराष्ट्र राज्य यांचेवतीने मंगळवेढा येथे श्री संत दामाजी पंत ज्ञानक्रांती
राज्यस्तरीय शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र विधानसभा
तालुका अध्यक्ष तथा मंगळवेढा- पंढरपूरचे विद्यमान आमदार समाधान महादेव आवताडे यांचे
प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद शिक्षक समितीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुरेश पवार
यांचे शुभहस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले, यावेळी मंचावर मुंबई येथील अनिता
चौधरी,सह्याद्री वाहिनीच्या निवेदक वनिता घाडगे,अध्यक्ष शफिक शेख,डॉ.निसार शेख,
गायकवाड सर,नगरसेवक, नगरसेविका उपस्थित होत्या! शंकरराव यादव सर हे स्काऊट -गाईडचे
सोलापूर जिल्हा ट्रेनिंग कमिशनर म्हणून कार्यरत असून स्काऊट -गाईड मधील त्यांचे
कार्य विशेष उल्लेखनीय आहे, नुकतेच त्यांच्या ११ विद्यार्थ्यांना राष्ट्रीय
स्तरावरील राष्ट्रीय सुवर्ण बाण पुरस्कार नवी दिल्ली मिळाला असून हरियाणा येथे
त्यांचा सन्मान करण्यात आला होता.शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांची विविध क्षेत्रातील
कार्यकर्तुंत्वाची दखल घेत संस्थेने हा पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले आहे.
या पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ.रामदास देशमुख व पदाधिकारी,शाळा
व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष विजयकुमार चव्हाण,स्काऊट-गाईड जिल्हा पदाधिकारी यांनी
अभिनंदन केले.

