*सांगली जिल्ह्याचे भूषण आणि सोनार समाजाचे खंबीर नेतृत्व*. शांत, संयमी आणि आपल्या
कार्यकर्तृत्वाने समाजाला नवी दिशा देणारे उद्योजक, सांगली जिल्हा सोनार समाज
अध्यक्ष आणि समाज भूषण पुरस्काराने सन्मानित आदरणीय श्री. प्रकाश पोतदार समडोळीकर
साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. वाढदिवसानिमित्त त्यांच्या गौर्वार्थ
लेख. स्वतःचा ब्रँड असावा ही बालपणा पासूनची जिद्द आणि कष्टाची जोड यातूनच
शून्यातून विश्व उभे राहते. हे वाक्य सांगलीच्या औद्योगिक क्षेत्रातील अग्रगण्य
नांव श्री. प्रकाश महादेव पोतदार समडोळीकर यांना तंतोतंत लागू पडते. सोलापूर सोनार
समाज संस्थेच्या वतीने नुकताच डिसेंबर 2025 मध्ये त्यांना " समाज भूषण " पुरस्कार
प्रदान करून गौरविण्यात आले आहे. त्यानिमित्त त्यांचा थक्क करणाऱ्या प्रवासाचा हा
आढावा. *संघर्षातून स्वावलंबनाकडे -- 75 हजाराचे पाहिले पाऊल* 19 मार्च 1960 रोजी
वडील श्री. महादेव व आई सौं कुसुम यांच्या पोटी प्रकाशजींचा जन्म झाला. 1978 मध्ये
एस एस सी ( S. S. C.) उत्तीर्ण झाल्यावर नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग
सुरु करण्याची तीव्र ईच्छा त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. सुशिक्षित बेरोजगार
योजने अंतर्गत अवघ्या 75 हजार रुपयांचे कर्ज घेऊन त्यांनी मे. पोतदार इंडस्ट्रिज,
सांगली या पहिल्या कारखान्याचा पाया रचला. एका सामान्य तरुणाने घेतलेली ही झेप
आजच्या तरुण पिढीसाठी मोठी प्रेरणा आहे. *जागतिक भरारी : लंडन ते श्रीलंकेपर्यंत
पोतदार ब्रँड* -- श्री. प्रकाशजींच्या जिद्दीतून आज मे. पोतदार इंडस्ट्रिज सांगली
आणि मे. पोतदार इंजनिअरींग सर्व्हिसेस हे दोन भव्य प्रकल्प उभे राहिले आहेत.
त्यांनी उत्पादीत केलेली सुपारी कटिंग मशिन्स आज केवळ भारतातच नव्हे तर लंडन,
श्रीलंका आणि बांगला देश सारख्या देशात निर्यात होतात. प्रत्यक्ष अप्रत्येक्ष
रोजगार मिळाला आहे. ही त्यांची मोठी सामाजिक कामगिरी आहे. *सुसंस्कृत कुटुंब -
संस्काराची शिदोरी* -- 8 डिसेम्बर 1985 रोजी कोल्हापूर येथील श्री. वसंतराव पोतदार
कोगीलकर यांची सुविद्य कन्या उज्वला यांचेशी त्यांचा विवाह झाला. सौं. उज्वला
ताईंच्या संस्कारामुळेच आज पोतदार कुटुंब हे एकात्मतेचे आदर्श उदाहरण आहे. आई,
वडील, मुलगा, सून आणि चार नातवंडे असे तीन पिढ्याचे एकत्र कुटुंब अत्यंत आनंदाने
नांदत आहे.
*कलेचा वारसा स्वरांजली म्युझिक अकॅडमी*. प्रकाशजींचा मुलगा श्री. विवेक
पोतदार यांनी वडिलांच्या उद्योजकतेच्या सोबतच कलेचा वारसा जतन केला आहे. तबला
वादनात एम. ए. करताना त्यांनी प्रथम क्रमांक पटकावला, ज्याबद्दल त्यांना केंद्र
सरकारची एक लाख पन्नास हजार रुपयांची स्कॉलरशिप मिळाली. आज ते स्वरांजली म्युझिक
अकॅडमी च्या माध्यमातून पन्नास हुन अधिक विध्यार्थ्यांना संगीताचे शिक्षण देत आहेत.
सुनबाई सौं. वैदेही या फॅशन डिझायनर असून मुलगी वर्षा वाणिज्य पदवीधर तर जावई
सॉफ्टवेअर इंजिनियर असून संपूर्ण कुटुंब उच्च शिक्षित आहे. *समाज भूषण - माणुसकीचा
सन्मान*. सांगली जिल्हा श्री. विश्वकर्मा देशस्त सोनार समाजाचे अध्यक्ष म्हणून काम
करताना प्रकाशजीनी गोरगरिबांच्या मदतीसाठी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यांच्या याच
निःस्वार्थ सेवेची आणि औद्योगिक यशाची दखल घेऊन त्यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित
करण्यात आले आहे. सोलापूर चा "समाज भूषण पुरस्कार " हा त्यांच्या ध्येयवेड्या
प्रवासाचा यथोचित बहुमान आहे.अशा या उतुंग व्यक्तिमत्वास वाढदिवसा निमित्ताने श्री.
प्रकाश महादेव पोतदार यांना उत्तम आरोग्य, उदंड आयुष्य, सुख, समाधान, समृद्धी आणि
ऐश्वर्य लाभो हीच ईश्वर चरणी आणि श्री. संत शिरोमणी नरहरी महाराजांच्या चरणी
मनापासून प्रार्थना ! श्री. प्रकाशजी आपल्या हातून अशीच समाजाप्रती असलेली निःस्पृह
सेवा आम्हां सर्वासाठी प्रेरणादायी आहे. आपल्या हातून अशीच समाजसेवा आणि देश सेवा
निरंतर घडत राहो हीच मंगलमय सदिच्छा ! श्री प्रकाशजी पोतदार यांचा संपर्क क्र.
94230 30691 असा आहे. वसंत पोतदार, सोलापूर मोबाईल 94230 65915

