*प्रतिनिधी* *उमेश काशीकर सोलापूर*
*स्वराज्य माहिती अधिकार संघटनेच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून 24 महिलांना स्वराज्य कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानित*
*स्वराज्य पोलिस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना सोलापूर जिल्ह्याच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत असलेल्या 24 महिलांना *स्वराज्य कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले*.
*सोलापूरच्या चौडेश्वरी मंगलकार्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्वराज्य च्या प्रदेशाध्यक्षा सौ. धनश्रीताई उत्पात ह्या होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून स्वराज्य चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष दिपक कांबळे, विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध प्रमुख उमेश काशीकर, प्रसिद्ध उद्योपती सौ. निता रघोजी, पत्रकार सौ. श्रुती गांधी ह्या होत्या.*
*स्वराज्य पोलीस मित्र, पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक तथा राष्ट्रीय मुख्य महासचिव कमलेश शेवाळे (देवा सर) यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.*
*या प्रसंगी दिपक कांबळे, सौ. धनश्रीताई उत्पात, सौ. निता रघोजी, सौ. श्रुती गांधी, चंद्रकांत वेदपाठक यांनी आपले मनोगत व्यक्त करून उपस्थिताना मार्गदर्शन केले.*
*स्वराज्य कर्तृत्ववान महिला पुरस्काराने सन्मान चिन्ह देऊन, शाल पांघरून, मोत्याचे माळ देऊन सत्कार करण्यात आला.*

