स्वामीज्ञ फाउंडेशन* ऑफ इंडिया याचा लोकार्पण सोहळा संपन्न

रायगड प्रतिनिधी -- श्री संत नरहरी सोनार यांच्या समाधी सोहळा औचित्य साधून आज दिनांक 4 फेब्रुवारी रोजी *स्वामीज्ञ फाउंडेशन* ऑफ इंडिया याचा लोकार्पण सौ लक्ष्मीबाई राजाराम घोडके व श्री राजाराम नरहरी घोडके तसेच श्री गुरुवर्य अनिल मोरे महाराज व भाजपा कामगार मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष मंगेशजी चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आला. स्वामीज्ञ फाउंडेशन ही संस्था सामाजिक,शैक्षणिक,आरोग्य अशा विविध क्षेत्रात कार्यरत असून अनेक गरजू लोकांना सर्व सेवा सुविधा उपलब्ध करून देण्याचे कार्य करते.समाजातिल उपेक्षित घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्यासाठी सातत्य पुर्ण काम केले जाते. स्वामीज्ञ फाउंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष अरुण राजाराम घोडके व सौ अंजली अरुण घोडके यां दांपत्यांनी सदर सामाजिक संस्थेच्या माध्यमातून विविध सामाजिक, धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करतात तसेच यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या समाजसेवेच्या प्रेरणेने प्रेरित होऊन अनेक समाज बांधवां या कार्यात सहभागी होतात यावेळी स्वामीज्ञा फाउंडेशनच्या सर्व सदस्य व पदाधिकारी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. --------- स्वामीज्ञ् फाउंडेशनच्या वतीने श्री स्वामी समर्थ महाराज पालखी ठाणे ते श्री क्षेत्र अक्कलकोट पदयात्रा सेवेकरी मंडळाचे गुरुवर्य श्री.अनिल मोरे महाराज यांच्या हस्ते स्वामीज्ञ फाॅडेशन लोकार्पण सोहळा संपन्न झाला तसेच स्वामी समर्थ पालखी सेवेकरी यांना चहा/नाष्टाची व्यवस्था आई तुळजाभवानी खानावळ येथे करण्यात आली.यावेळी 60 सेवेकरी उपस्थित होते. ---------

Post a Comment

Previous Post Next Post

Contact Form