पंढरपूर प्रतिनिधी - राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे नुकतेच विमान
अपघातात दुःखद निधन झाले असून यामुळे खऱ्या अर्थाने पश्चिम महाराष्ट्राचे खूप मोठे
नुकसान झाले असून कधी ही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली असून अजितदादांनी आपल्या
उपमुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात तीर्थक्षेत्र पंढरपूरसाठी भरभरून निधी दिला आहे.
त्यातील एक महत्वाची आठवण म्हणजे आपल्या पंढरपूर शहरातील यमाई तलाव सुशोभीकरण
करण्याचा निर्णय माजी आमदार प्रशांत परिचारक व नगरसेवक यांनी यमाई तलावामधील गाळ
काढून हा तलाव एक पर्यटनस्थळ व्हावे म्हणून आग्रही भूमिका घेतली आणि यातील गाळ
काढण्यासाठी लोक वर्गणी गोळा करून हा गाळ काढण्याचे ठरवले आणि हे करत असताना सर्व
नगरसेवक व पदाधिकारी सर्व भागातून मांगो उशिसे जो देगा खुशिसे. ही घोषणा देत
लोकवर्गणी गोळा करत असतानाच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार पंढरपूर दौऱ्यावर
आल्यानंतर ही वस्त्तुस्थिती समोर पाहून दादांनी तात्काळ बारामती येथील संबंधित
अधिकारी यांना सूचना देऊन गाळ काढण्यासाठी लागणारी सर्व मशिनिरी पाठवून द्या आणि
प्रशांत परिचारक यांना सुचना केली कि तुम्ही नगरपालिकेचे वतीने फक्त डिझेल द्या
बाकी मैं हू ना या शब्दात दादांनी सर्व यंत्रणा दिली आणि तो गाळ काढण्याबा विषय
मार्गी लागला. भव्यदिव्य असा यमाई तलाव हा आज पंढरपुरात येणारे वारकरी, पर्यटक
यांचेसाठी पर्यटन व आपल्या पंढरपूर शहरातील नागरिकांसाठी ट्रॅक उपलब्ध झाला ही खूप
मोठी आठवण अजितदादांची पंढरपूरकरवासियांसाठी असून दादांचे नातं हे कायम जोडलेले
राहावे म्हणून पंढरपूर शहर राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी, राष्ट्रवादी युवक
कॉंग्रेस, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस यांच्या वतीने आम्ही विनम्रपूर्वक मागणी करतो
कि, यमाई तलाव याला लोकनेते अजितदादा पवार स्मृती तलाव असे नामकरण करण्यात यावे असा
ठराव पंढरपूर नगरपरिषदेने पास करून दादांच्या स्मृतीस आदरांजली ठरावी असे नामकरण
करावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राष्ट्रवादी युवकचे प्रदेश
सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी निवेदनाद्वारे पंढरपूर नगरपरिषदचे मुख्याधिकारी
यांना केलेली आहे. या निवेदनाची प्रत नगराध्यक्षा, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर च
गटनेते, पंढरपूर नगरपरिषद, पंढरपूर यांना देण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक
कॉंग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे, शहराध्यक्ष मुहम्मद उस्ताद, महिला
जिल्हाध्यक्ष वर्षाताई शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष दिगंबर सूडके, युवक शहराध्यक्ष अमोल
परबतराव, माजी शहराधक्ष सुधीर आबा भोसले,जिल्हा सरचिटणीस सारंग महामुनी, सूरज
पेंडाल जिल्हा युवक उपाध्यक्ष प्रदीप तांदळे, शहर कार्याध्यक्ष प्रदीप निर्मळ, शहर
उपाध्यक्ष संजय म्हणाने,धीरज टिकोरे शिवसेनेचे साईनाथ बडवे आदि उपस्थित होते.
